घरताज्या घडामोडीलालबागच्या राजाच्या दर्शनानंतर अभिनेत्री रुचिरा चाहत्यांकडून ट्रोल; म्हणाले 'बाकीच्या मंडळाचे पण पावतात...'

लालबागच्या राजाच्या दर्शनानंतर अभिनेत्री रुचिरा चाहत्यांकडून ट्रोल; म्हणाले ‘बाकीच्या मंडळाचे पण पावतात…’

Subscribe

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईसह राज्यभरातील गणेशभक्तांसह कलाकारही मोठ्या प्रमाणात हजेरी लावत आहेत. अशातच मराठमोळी अभिनेत्री रुचिरा जाधव हिने लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. पण लालबागच्या राजाच्या दर्शनानंतर रुचिराला अनेकांनी ट्रोल केले आहे.

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईसह राज्यभरातील गणेशभक्तांसह कलाकारही मोठ्या प्रमाणात हजेरी लावत आहेत. अशातच मराठमोळी अभिनेत्री रुचिरा जाधव हिने लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. पण लालबागच्या राजाच्या दर्शनानंतर रुचिराला अनेकांनी ट्रोल केले आहे. (After Trolled Marathi Actress Ruchira Jadhav Reply To Fans Lalbaugcha Raja 2023)

लालबागच्या राजाच्या दर्शनानंतर रुचिराने सोशल मिडीयावर गणपती बाप्पासोबतचे खास फोटो शेअर केलेत. पण या फोटोखाली रुचिराच्या फॅन्सने नाराजीयुक्त कमेंट केल्या आहेत. विशेष म्हणजे चाहत्यांच्या या कमेंट्सवर रुचिरानेही सणसणीत उत्तर दिले आहे.

- Advertisement -

रुचिराने लालबागच्या राजासोबतचे खास फोटो सोशल मिडीयावर शेअर केलेत. या फोटोखाली एका नेटकऱ्याने केलेली कमेंट व्हायरल झालीय. “बाकीच्या मंडळाचे पण पावतात देव बर का नवसाला”, अशी कमेंट रुचीराच्या पोस्टवर एका नेटकऱ्याने केली आहे. त्यावर रुचिरानेही त्याला सणसणीत उत्तर दिले आहे. “मी नवस करत नाही. मी बाप्पाला भेटायला जाते. आणि मुळात नेहमी काहीतरी मागण्यापेक्षा, जे दिलंय त्याबद्दल gratitude व्यक्त करायला आवडतं मला”, असे रुचिरा म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ruchira Jadhav (@ruchira_rj)

दरम्यान, रूचिरा आणि त्या नेटकऱ्याची कमेंट चांगलीच व्हायरल झाली आहे. रुचिरा आज लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेली होती. रुचिराने लालबागच्या राजाचे मनोभावे दर्शन घेतले आणि प्रार्थना केली. रुचिराच्या या फोटोखाली तिच्या फॅन्सनी गणपती बाप्पा मोरया अशा कमेंट केल्यात. रुचिरा सध्या नवीन प्रोजेक्ट मध्ये काम करत नसली तरीही तिच्या आगामी प्रोजेक्टची तिचे फॅन्स वाट बघत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Gautami Patil : चित्रपटात काम करणार का? गौतमी पाटीलनं दिलं बिनधास्त उत्तर; म्हणाली…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -