घरमनोरंजनट्विटर हॅण्डल गमावले, आता इन्स्ट्राग्रामचाही कंगनाविरोधी कारवाईचा पवित्रा

ट्विटर हॅण्डल गमावले, आता इन्स्ट्राग्रामचाही कंगनाविरोधी कारवाईचा पवित्रा

Subscribe

नेमकं ट्विटर अकाऊंट सस्पेंड झाल्याच्या दुसर्‍या दिवशीच पोस्ट इंस्टावरुन डिलिट झाल्यानंतर कंगना चांगलीच बिथरली असल्याचे दिसतेय.

कंगना आणि तिनं केलेली वादग्रस्त वक्तव्य हे  तर जगजाहीर आहे. चित्रपट असो किंवा एखादा सामाजिक मुद्दा इतकच नाही तर बॉलिवूड सेलिब्रिटींवर थेट निशाणा साधण्यासाठी कंगना सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करते. नेहमीच चर्चेच्या झोतात असणारी कंगनाचे ट्विटर अकाऊंट काही दिवसांपूर्वी सस्पेंड करण्यात आले होते या नंतर कंगनाने मोठ्या प्रमाणात इंस्टाग्राम अकाऊंटचा वापर करत असल्याचे दिसत आहे. पण आता ट्विटर हॅण्डल गमवल्या नंतर आता इन्स्ट्राग्रामने  कंगनाविरोधी कारवाईचा पवित्रा उचलला असल्याचे दिसून येत आहे. कंगनाने अपलोड केलेली एक पोस्ट इन्स्ट्राग्रामने  डिलिट केली असल्याचे पहायला मिळत आहे. खुद्द कंगनानेच याबाबत खुलासा केला आहे. या घटने नंतर कंगना भारीच चिडली असल्याचे दिसत आहे. पोस्ट डिलिट झाल्यानंतर कंगनाने इंस्टा स्टोरी मध्ये लिहलं आहे की,”इन्स्टाग्रामने माझी एक पोस्ट डिलिट केली आहे, ज्यात मी कोव्हिडला संपवण्याची धमकी दिली आहे. कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या.ट्विटरवर दहशतवादी आणि कम्युनिस्ट बद्दल सहानुभूती दाखविणारे पहिले होते. पण आता कोव्हिड फॅनक्लब ! कमाल आहे. इंस्टाग्राम वर माला दोन दिवस झाले आहेत पण आता असं वाटत आहे की एका आठवड्यापेक्षा जास्त काळ टिकू शकणार नाही.” अशा मजेशीर अंदाजात कंगनाने आपलं मत प्रकट केलं आहे.


कंगनाने नुकतच तिच्या इंस्टा वर पोस्ट करत तिला कोरोनाची लागण झाली असल्याची महिती दिली होती. फोटो शेअर करत तिने लिहलं होतं की,””गेल्या काही दिवसांपासून मला थकल्यासारखं आणि डोळ्यात जळजळ आणि अशक्तपणा वाटत होतं. हिमाचलला जाऊ शकतो असं वाटत होतं म्हणून मी काल माझी चाचणी केली आणि आज मी कोव्हिड पॉझिटिव्ह आले आहे. मी स्वत:ला क्वारंटाइन करून घेतलं आहे. मला काही कल्पनाच नाही आहे की हा व्हायरस माझ्या शरिरात पार्टी करतोय, आता मला एवढं माहिती आहे की मीत्याचा सामना करून नक्की संपवेन, कोणत्याही शक्तीला तुमच्यापेक्षा मोठे होऊन देऊ नका, तुम्ही जर घाबरलात तर ते आणखी तुम्हाला घाबरवेल. चला या कोविड-19 चा विनाश करूया, हा काही नाही फक्त एका ठराविक काळाकरता आलेला ताप आहे ज्याला जास्त प्रसिद्धी मिळाली आणि लोकांना मानसिक त्रास देत आहे. हर हर महादेव” नेमकं ट्विटर अकाऊंट सस्पेंड झाल्याच्या दुसर्‍या दिवशीच पोस्ट इंस्टावरुन डिलिट झाल्यानंतर कंगना चांगलीच बिथरली असल्याचे दिसतेय.

- Advertisement -

हे हि वाचा – Mother’s day 2021:बॉलिवूड मधील सेलिब्रिटींचे त्यांच्या आईसोबत असलेलं खास नातं जाणून घ्या

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -