घरमनोरंजन'भोला' चित्रपट पाहून आल्यावर पती-पत्नीमध्ये झालं कडाक्याचं भांडण

‘भोला’ चित्रपट पाहून आल्यावर पती-पत्नीमध्ये झालं कडाक्याचं भांडण

Subscribe

सध्या बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा भोला चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. अनेक प्रेक्षक चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहत आहेत. गुजरातमधील एक पती-पत्नी देखील हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात गेले होते. मात्र, चित्रपट पाहून आल्यानंतर त्या पती-पत्नीमध्ये भांडण सुरु झाले त्यांचं भांडण हळूहळू इतकं वाढलं की, दोघांची मारामारी सुरु झाली. शेवटी हे प्रकरण पोलिस ठाण्यामध्ये पोहोचलं.

 ‘भोला’ चित्रपट पाहून आल्यावर पती-पत्नीमध्ये झालं भांडण

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

मिळालेल्या माहितीनुसार, पतीला भोला चित्रपट आवडला नाही आणि त्याने पत्नीला सांगितले की, एवढा खराब चित्रपट पाहून पैसे वाया जातात. पत्नीला ही गोष्ट आवडली नाही आणि दोघांमध्ये भांडण सुरू झाले. पत्नीने पतीविरुद्ध मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी पतीवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

- Advertisement -

या महिलेने आरोप केलाय की, ती आपल्या पतीसोबत भोला चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात गेली होती. मात्र, त्याला हा चित्रपट अजिबात आवडला नाही आणि त्याने या चित्रपटामुळे पैसे वाया गेल्याचं म्हणत तिला घरी आल्यावर मारहाण केली. शिवाय रागात तिला जीवे मारण्याची धमकी देखील दिली. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी महिलेच्या पतीला ताब्यात घेतलं असून परिसरात हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलं आहे.

 

- Advertisement -

हेही वाचा :

अभिषेकवर रागावली ऐश्वर्या; व्हिडिओ व्हायरल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -