घरमनोरंजन'दिल्ली क्राईम 2' चा ट्रेलर बघून उडेल काळजाचा थरकाप

‘दिल्ली क्राईम 2’ चा ट्रेलर बघून उडेल काळजाचा थरकाप

Subscribe

दिल्ली क्राईम 2' सोबत पुन्हा एकदा शेफाली शाह डीसीपी वर्तिका चतुर्वेदीच्या भूमिकेमध्ये दिसून येणार आहे. दरम्यान, यावेळी गुंता इतका वाढलेला असेल की तो सोडवता-सोडवता डीसीपी स्वताः गुंत्यात अडकताना दिसत आहे

नेटफ्लिक्सवरील प्रसिद्ध क्राईम सीरिज ‘दिल्ली क्राईम’ ने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडली आहे. पहिल्या सीझनच्या जबरदस्त प्रतिसादानंतर या वेब सीरिजचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच या सीरिजच्या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. मागील अनेक दिवसांपासून दुसऱ्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. दिल्ली क्राईम सीरिजमध्ये पहिल्या सीजनच्या तुलनेत दुप्पट गुन्हेगारी दाखवण्यात आली आहे. शिवाय या सीरिजमध्ये जबरदस्त दहशत, भीती दाखवण्यात येईल.

‘दिल्ली क्राईम 2’ सोबत पुन्हा एकदा शेफाली शाह डीसीपी वर्तिका चतुर्वेदीच्या भूमिकेमध्ये दिसून येणार आहे. दरम्यान, यावेळी गुंता इतका वाढलेला असेल की तो सोडवता-सोडवता डीसीपी स्वताः गुंत्यात अडकताना दिसत आहे. या सीझनमध्ये सुद्धा पहिल्या सीझनचे कलाकार दिसून येत आहेत.

- Advertisement -

नुकताच रिलीज झालेल्या ट्रेलरपाहून अंगावर काटा येत आहे.थरकाप उडवणारा आणि अनेकत गुंतागुंतीच्या या
ट्रेलर प्रेक्षकांना अधिकच भुरळ पाडत आहे. 2 मिनीट 14 सेकंदाची या ट्रेलरची झलक आहे.

2019 मध्ये रिलीज झाला होता पहिला सीझन
‘दिल्ली क्राईम’चा पहिला सीझन 2019 मध्ये नेटफ्लिक्स प्रदर्शित झाला होता. ज्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. या सीरिजचा पहिला पार्ट निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणावर आधारित होता. त्यावेळी देशात निर्भया सामुहिक बलात्कारामुळे भारत हळहळत होता. त्यामुळे या सीझनला त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.


हेही वाचा :भारताच्या इतिहास पहिल्यांदाच अमेरिकन गायिका मेरी मिलबेन होणार स्वातंत्र्य सोहळ्यात सहभागी

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -