Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन अगंबाई सासूबाईनंतर आता सूनबाई येणार प्रेक्षकांच्या भेटीला

अगंबाई सासूबाईनंतर आता सूनबाई येणार प्रेक्षकांच्या भेटीला

अगंबाई सूनबाई या नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे.

Related Story

- Advertisement -

‘अगबाई सासूबाई’ ही झी मराठी वरील मालिका घराघरात पोहचली. आसावरी आणि अभिजीत राजे यांच्या प्रेमकथेने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले. यातील बबड्या हे आगळेवेगळे पात्र प्रेक्षकांच्या लक्षात राहणारे आहे. या मालिकेला सर्वत्र प्रसिद्धि मिळाली. त्यामुळेच मालिकेचा नवा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. परंतू आता सासूबाईंच्या ऐवजी अगंबाई सूनबाई प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आसावरी आणि अभिजीत यांची केमेस्ट्री प्रेक्षकांना आवडली. आसावरीची भूमिका साकारात असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अभिजीत यांच्या भूमिकेत अभिनेते गिरीश ओक आहेत. दोघांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली. आता नव्या भागात नक्की काय असणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.12 मार्चपासून ही नवी मालिका सुरु होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)


अगंबाई सूनबाई या नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. या प्रोमोमध्ये आसावरी ऑफिसच्या कामामध्ये व्यस्त दाखवली आहे. यात अभिजीत राजे हे घरातून आसावरीला कॉल करत जेवणाची चौकशी करत आहेत. एकंदरीत त्यातून अभिजित राजे संसाराचा गाढा सांभाळताना दिसत आहेत. म्हणजेच या दुसऱ्या भागात अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अभिनेते गिरीश ओक दोघेही दिसणार आहेत. परंतू, याच प्रोमोत शुभ्राही आणि तिच्या कडेवर एक छोटं बाळही दिसतं आहे. पण ही शुभ्रा म्हणजे अभिनेत्री तेजश्री प्रधान नसून एक नवीन अभिनेत्री आहे. तेजश्रीच्या ऐवजी आता उमा पेंढारकर ही अभिनेत्री दिसणार आहे. उमानं यापूर्वी ‘स्वामिनी’ मालिकेत पार्वतीबाईंची भूमिका साकारली होती.


- Advertisement -

हेही वाचा – प्रियांका चोप्राचा ड्रेस पाहून लोकं म्हणाले, चल रे भोपळ्या टूणूक टूणूक

- Advertisement -