घरमनोरंजनSushant Singh Rajput Case: अखेर AIIMS ने CBI कडे सोपवला अहवाल

Sushant Singh Rajput Case: अखेर AIIMS ने CBI कडे सोपवला अहवाल

Subscribe

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी एम्सने सीबीआयकडे अहवाल सादर केला आहे. सीबीआयनेही एम्सच्या अहवालाचे विश्लेषण सुरू केले आहे. सुशांतचा मृत्यू नेमका कसा झाला याचा निष्कर्ष सीबीआय या अहवालावरून काढणार आहे. तसेच एम्सच्या अहवालावर सीबीआय अंतिम निर्णयापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. सुशांत सिंह राजपूतची हत्या झाली की त्याने आत्महत्या केली? पुराव्यांच्या आधारावर सीबीआय निर्णयावर घेईल. ऑटोप्सी आणि व्हिसेराचा तपास अहवाल सीबीआयला सोपवण्यात आला आहे.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरण आता सीबीआयसाठी महत्त्वाचे राहिले नाही, असा आरोप सुशांतच्या कुटुंबीयांचे वकील विकास सिंह यांनी केला होता. पण आता एम्सचा अहवाल सीबीआयकडे सादर करण्यात आला आहे. यानंतर सीबीआयकडून पुन्हा एकदा तपास सुरू होईल आणि अभिनेत्याच्या मृत्यूशी संबंधित अनेक रहस्ये उघडकीस येतील, असे समजले जाते.

- Advertisement -

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने १४ जून रोजी त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर पासूनच त्याच्या मृत्यूची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी सर्व स्तरातून होऊ लागली. दरम्यान, या प्रकरणातून बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शनदेखील उघड झाले असून एनसीबीने सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्तीला अटक केली आहे.

हेही वाचा –

नायरमध्येही कोव्हिशील्डच्या चाचणीला सुरुवात; १०० स्वयंसेवकांवर करणार चाचणी 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -