घरमनोरंजनलेकीच्या वाढदिवसानिमित्त ऐश्वर्या-अभिषेकने शेअर केली खास पोस्ट

लेकीच्या वाढदिवसानिमित्त ऐश्वर्या-अभिषेकने शेअर केली खास पोस्ट

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्याचा आज 12 वा वाढदिवस आहे. आराध्याच्या वाढदिवसानिमित्त अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायने खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. जी सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

ऐश्वर्याची लेकीसाठी खास पोस्ट

ऐश्वर्याने शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती आराध्यासोबत सेल्फी घेताना दिसत आहे. पिंक कलरच्या फ्रॉकमध्ये आराध्या देखील खूप क्युट दिसत आहे. फोटोसोबतच ऐश्वर्याने तिच्या मुलीसाठी कॅप्शन देखील लिहिलं आहे. माझ्या प्रिय ऐंजल आराध्या, मी तुझ्यावर खूप प्रेम करते. तू माझ्या आयुष्यातील पूर्ण प्रेम आहेस. मी तुझ्यासाठी श्वास घेते… माझा आत्मा. तुझ्या 12 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. देव तुला आशीर्वाद देवो. तू सर्वोत्तम आहेस.” असं ऐश्वर्याने लिहिलं आहे.

अभिषेकची पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhishek Bachchan (@bachchan)

- Advertisement -

अभिषेकने शेअर केलेल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये त्याने आराध्यासोबतचा एक जुना फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये आराध्या अभिषेकच्या मांडीवर बसली असून अभिषेक तिच्याकडे कौतुकाने पाहत आहे. हा फोटो शेअर करत अभिषेकने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “माझ्या लहानग्या परीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी तुझ्या सर्वात जास्त प्रेम करतो.”


हेही वाचा  : रश्मिकानंतर काजोलचा डीप फेक व्हिडीओ व्हायरल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -