IIFA २०२२ च्या लुक मुळे ऐश्वर्या पुन्हा झाली ट्रोल

IIFA २०२२ या पुरस्कार सोहळ्याला बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनaishwarya rai bachchan हिने सुद्धा हजेरी लावली होती. त्यावेळी ऐश्वर्याने जो लुक केला होता त्याला काहींनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या तर काहींनी तिला ट्रॉल सुद्धा केले.

चित्रपट सृष्टीमधले कोणतेही पुरस्कार सोहळे हे नेहमीच चर्चेत असतात. सिने कलाकार आणि प्रेक्षक सुद्धा या पुरस्कार सोहळ्यासाठी उत्सुक असतात. यंदाचा इंडियन इंटरनॅशनल फिल्म अकादमी पुरस्कार (International Indian Film Academy Awards). सोहळा हा अबुधाबी मध्ये पार पडला. या पुरस्कार सोहळ्याला बॉलिवूड मधील अनेक नामवंत कलाकारांनी हजेरी लावली होती. या पुरस्कार सोहळ्यात जे सेलिब्रिटी ज्या लुकमध्ये दिसले होते त्याने त्यांच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. या पुरस्कार सोहळ्याला बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (aishwarya rai bachchan) हिने सुद्धा हजेरी लावली होती. त्यावेळी ऐश्वर्याने जो लुक केला होता त्याला काहींनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या तर काहींनी तिला ट्रॉल सुद्धा केले.

आयफा पुरस्कार सोहळ्यामध्ये ऐश्वर्याने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. त्यावर तिने गडद रंगाची लिपस्टिक लावली होती. ऐश्वर्याचा हा लुक तिच्या काही चाहत्यांच्या पसंतीस उतरला नाही. आणि त्यावरून तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. त्याचबरोबर हे इफ्तार २०२२ नसून आयफा २०२२ आहे, हा भीतीदायक लुक आहे अशा प्रतिक्रिया तिच्या फोटोवर अनेकांनी दिल्या. या आधी सुद्धा अनेक वेळा ऐश्वर्या (aishwarya rai bachchan)  तिच्या लुकमुळे ट्रोल झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या कान्स फिल्म फेस्टिवलच्या दुसऱ्या दिवशी ऐश्वर्या राय दिसली होती. त्यावेळी सुद्धा ऐश्वर्याने जो लुक केला होता तो चाहत्यांच्या पसंतीस उतरला होता. त्यावेळी रेड कार्पेट वरचा ऐश्वर्याचा हा लुक तिच्या चाहत्यांमध्ये सुद्धा प्रचंड चर्चेत होता. पण त्या नंतरही ऐश्वर्या आणखी दोन लुक मध्ये समोर अली होती, पण तिचे ते दोन लुक हे तिच्या चाहत्यांना आवडले नव्हते त्याही वेळी ऐश्वर्याला ट्रोल करण्यात आले होते.

२०२२ च्या कान्स फिल्म फ़ेस्टिकवलं मध्ये सुद्धा ऐश्वर्या अशाच भडक कपड्यांच्या लुक मध्ये दिसली होती. ऐश्वर्या राय बच्चन बहुतांश वेळा अभिषेक बच्चन (abhishek bachachan) सोबत विविध फिल्म फेस्टिवल आणि पुरस्कार सोहळ्यांमध्ये दिसते. ऐश्वर्या राय बच्चन हिने आजवर अनेक चित्रपटांमधून विविध भूमिका साकारल्या आहेत. ऐश्वर्या रायचे (aishwarya rai bachchan) चाहते सुद्धा तिच्या लुकला उत्तम प्रतिसाद देत असतात. ऐश्वर्या सुद्धा सोशल मीडिया वरून तिचे फोटो पोस्ट असत असते. पण काही वेळा मात्र ऐश्वर्याला ट्रोलिंगचा सामना करावा करावा लागतो. सिने सृष्टीतील अभिनेते किंवा अहिनेत्री केव्हा केव्हा अधिक आकर्षक दिसण्यासाठी वेगवेगळे लुक करत असतात, वेगवेगळ्या पद्धतीचे डिझाईन केलेले कपडे घालतात पण काही वेळा त्यांच्या या आगळ्या वेगळ्या फॅशन्स हिट ठरतात तर काही वेळा त्यांच्या या फॅशन्स फ्लॉप ठरतात. आणि म्हणून त्यांना ट्रोलिंगला सामोरं जावं लागतं.