HomeमनोरंजनAishwarya Narkar : संसारात पैशांची बचत कशी करावी, ऐश्वर्या नारकरांनी सांगितला अनुभव

Aishwarya Narkar : संसारात पैशांची बचत कशी करावी, ऐश्वर्या नारकरांनी सांगितला अनुभव

Subscribe

घर,संसार म्हटलं की महत्त्वाचं असतं बचत करणं. मग ते सामान्य नागरिक असो किंवा सेलिब्रिटी. सर्वांनाच आपल्या घरासाठी, संसारासाठी काटकसर किंला पैशांची बचत ही करावीच लागते. संसाराच्या सगळ्या बाजू उत्तमप्रकारे सांभाळत ऐश्वर्या नारकरांनी गेली अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. अभिनेत्रीने नुकत्याच युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. पैशांचं नियोजन कसं करावं, संसारात पैशाची बचत कशी करावी. दरम्यान त्यावेळची परिस्थिती आणि त्यांना त्यातून कसा मार्ग काढला तेही सांगितलं.

अभिनेत्री म्हणतात, “हे क्षेत्र पैशांच्या बाबतीत खूप अस्थिर आहे. पण, मला असं वाटतं की आम्ही अगदी सुरुवातीपासून नियोजन केलं होतं. जेव्हा घर घ्यायचं असं आमचं ठरलं, तेव्हा आम्ही दोघांनी वर्षाला दोन लाखांच्या आसपास पैसे जमवले होते. तेव्हा आम्ही ठरवलं होतं की, आपल्याकडे एवढीच रक्कम आहे ना… मग त्याहून कमी पैशात सगळं बघायचं, तेवढ्यात भागवायचं आमची लाइफस्टाइल मर्यादीत ठेवली. त्यामुळे कधीच जास्तीचा पैसा आम्ही खर्च केला नाही. पैशांची बचत करण्यावर भर दिला.”

पुढे म्हणाल्या, “सुरुवातीच्या काळात कधी मला काम नसेल, कधी त्याला काम नसेल… तरी आमचे सेव्हिंग्जमध्ये पैसे असायचे. जरी 15 माणसं आमच्यावर अवलंबून असली तरी आम्ही त्याचं योग्य पद्धतीने नियोजन करायचो. त्यानंतर मग मी हिंदी मालिका केल्या. पुन्हा मराठीत आल्यावर बऱ्यापैकी मानधन मिळालं. एक काळ गेल्यावर चांगलं मानधन मिळू लागलं, मग आमच्यात तो कम्फर्ट झोन आला. त्यावेळी सुद्धा आम्ही लाइफस्टाइल बदलली नाही…यामुळे झालं काय तर पैसे वाचले आणि सेव्हिंग्ज देखील वाढल्या. व्यवस्थित पैसे जमल्यावर आम्ही दोघांनी आमच्या पहिल्या चित्रपटाची निर्मिती केली होती.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Aishwarya Narkar (@aishwarya.narkar)

त्यांनी पैसे वाचवण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे याचे देखील उपाय सांगितले. त्या म्हणाल्या “अंथरुण पाहून पाय पसरावेत हे आपल्याला मध्यमवर्गीय घरात शिकवलं जातं. तर ते कुठेतरी आत भिनलंच होतं.मला वाटतं तोच सेफ प्लान असू शकतो आपला की, जेवढं आहे त्याच्याहून थोडंसं कमी खर्च करु. आणि छान राहू.” अशाप्रकारे ऐश्वर्या नारकर यांनी पैसे बचतीचा सोपा अन् महत्वाचा उपाय सांगितलाय. ऐश्वर्या यांनी सांगितलेले उपाय सर्वांनी नक्कीच फॉलो करावे असेच आहे.

ऐश्वर्या नारकर या मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. ऐश्वर्या आणि अविनाश नारकर ही जोडीही अनेकांची फेव्हरेट जोडी आहे. ही जोडी गेली अनेक वर्ष मनोरंजन विश्वात काम करत आहेत.