Tuesday, February 23, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन ऐश्वर्या-अभिषेकचा लेकीसोबत 'देसी गर्ल' गाण्यावर डान्स

ऐश्वर्या-अभिषेकचा लेकीसोबत ‘देसी गर्ल’ गाण्यावर डान्स

बच्चन फॅमिलीतील अभिषेक, ऐश्वर्या त्यांच्या मुलीसोबत डांन्स करतानाचा एक व्हि़डिओ सध्या सोशल मिडियावर वायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ऐश्वर्या लेकीसोबत देसी गर्ल या गाण्यावर ठुमके मारताना दिसली.

Related Story

- Advertisement -

ऐश्वर्या राय,अभिषेक बच्चन आणि त्यांची मुलगी आराध्या बच्चन यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांच्या नातेवाईकांच्या लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती. या कार्यक्रमासंबंधीचे त्यांचे काही फोटोज् सोशलमीडियावर पाहायला मिळाले. या लग्नसभारंभातील ऐश्वर्या आणि त्यांची मुलगी आराध्याचा एक डान्स व्हिडिओ जबरदस्त वायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ऐश्वर्या, अभिषेक आणि आराध्या ‘देसी गर्ल’ या गाण्यावर ठुमका लावताना दिसले.

- Advertisement -

व्हिडिओमध्ये ऐश्वर्या, अभिषेक आणि आराध्या हे तिघेही स्टेजवर इतर बाकी लोकांसोबत उभे असतात. यानंतर जसं ‘दोस्ता’ना चित्रपटातील ‘देसी गर्ल’ हे गाणं वाजते तेव्हा ऐश्वर्या आणि आराध्या डांन्स करायला सुरुवात करतात. यामध्ये अभिषेकही पत्नी आणि मुलीसोबत डान्स करताना दिसले. आराध्याचा डान्स संपल्यावर ऐश्वर्या तिला आनंदाने मिठी मारते. आणि अभिषेकलाही त्याच्या मुलीच्या जबरदस्त डान्सचे आश्चर्य होते. यामध्ये आराध्याने लाल रंगाचा ड्रेस घातला आहे त्यात ती फारच सुंदर दिसत आहे.

ऐश्वर्या राय ही नेहमीच तिचे तिच्या मुलीसोबतचे फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते. ती तिच्या मुलीवरचे तिचे प्रेम व्यक्त करण्याची संधी कधीही सोडत नाही.


- Advertisement -

हेहि वाचा – रात्रीस खेळ चाले ३ मध्ये अण्णा नाईकांच्या नव्या भूमिकेचा खुलासा

- Advertisement -