Friday, March 28, 2025
27 C
Mumbai
HomeमनोरंजनAishwarya Rai and Abhishek Bachchan : डिव्होर्सच्या चर्चांदरम्यान ट्विनिंग लूकमध्ये दिसले अभिषेक- ऐश्वर्या

Aishwarya Rai and Abhishek Bachchan : डिव्होर्सच्या चर्चांदरम्यान ट्विनिंग लूकमध्ये दिसले अभिषेक- ऐश्वर्या

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांनी जोर धरला आहे. त्यामुळे दोघांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. दोघेही अनेक कार्यक्रमांमध्ये स्वतंत्रपणे जाताना दिसल्यानंतर ते वेगळे होणार असल्याच्या चर्चांना बळ आले. असे असताना अभिषेक किंवा ऐश्वर्याने यावर कोणतेही अधिकृत विधान केले नाही. गतवर्षी डिसेंबरमध्ये आराध्याच्या शाळेतील एका कार्यक्रमात तिचे आई- बाबा अर्थात ऐश्वर्या- अभिषेक हजार राहिले होते. ज्यामुळे ते पुन्हा एकत्र येतील अशी चाहत्यांनी आशा व्यक्त केली होती. मात्र, तसे काही झाले नाही. अशातच आता आशुतोष गोवारीकर यांच्या मुलाच्या लग्नात हे जोडपे ट्विनिंग लूकमध्ये एकत्र दिसले आहे. (Aishwarya Rai and Abhishek Bachchan spotted together in twin look)

सोशल मीडियावर ऐश्वर्या आणि अभिषेकचे ट्विनिंग लूकमधील काही फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत. आशुतोष गोवारीकर यांचा मुलगा कोणार्कच्या लग्नात त्यांनी एकत्र हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी आपला आऊटफिट मॅच केला होता. यावेळी त्यांच्या मॅचिंग आऊटफिटसोबत चेहऱ्यावरील स्मितहास्य पाहून चाहत्यांनीसुद्धा आनंद व्यक्त केला आहे. एकीकडे डिव्होर्सच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे हे कपल ट्विनिंग लूक करताना दिसल्याने सर्व काही सुरळीत असेल अशी आशा व्यक्त केली जातेय. अनेकांनी अभिषेक आणि ऐश्वर्या पुन्हा एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत, असेही म्हटले.

गतवर्षी डिसेंबरमध्ये ऐश्वर्या आणि अभिषेक लेकीच्या शाळेतील एका कार्यक्रमात एकत्र दिसले होते. यानंतर त्यांचं नातं संपुष्टात आल्याचे बोलले गेले. शिवाय ते लवकरच वेगळे होणार असेही म्हटले गेले. पण एका मोठ्या काळानंतर हे कपल पुन्हा एकदा एकत्र दिसलं आहे. यावेळी दोघांनीही पांढऱ्या शुभ्र ड्रेसमध्ये ट्विनिंग केले होते. ऐश्वर्याने व्हाईट ड्रेससोबत हातात मॅचिंग पोटलीसुद्धा घेतली होती. लूक पूर्ण करण्यासाठी तिने मॅचिंग ज्वेलरीदेखील परिधान केली होती. तर अभिषेकने पांढऱ्या शेरवानीत क्लासी लूक केला होता. सोबत फॉर्मल शूज परिधान करून लूक पूर्ण केला होता.

काही व्हायरल फोटोंमध्ये, हे जोडपं (इस्कॉनच्या) हरिनाम दास यांना भेटताना दिसत आहेत. हरिनाम दास यांनी अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर ऐश्वर्या आणि अभिषेकचे हे फोटो शेअर केले आहेत. या जोडप्याला श्री श्री राधा वृंदावन चंद्रजींचा आशीर्वाद घेण्यासाठी वृंदावन चंद्रोदय मंदिरात येण्याचे आमंत्रण देखील देण्यात आले. यासंबंधित कॅप्शनमध्ये माहिती दिली आहे.

हेही पहा –

Upcoming Movie : सस्पेन्स थ्रीलर चित्रपट शातिर येतोय प्रेक्षकांच्या भेटीला