घरमनोरंजनऐश्वर्या रायच्या बिग बजेट 'पोन्नियिन सेल्वन'चा टीझर आऊट

ऐश्वर्या रायच्या बिग बजेट ‘पोन्नियिन सेल्वन’चा टीझर आऊट

Subscribe

दिग्दर्शक मणिरत्न यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन’ उर्फ ‘पीएस 1’ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. मात्र आता चित्रपटाबाबत नवनवे अपडेट्स समोर येत आहेत. आता ‘पोन्नियिन सेल्वन’ चित्रपटाचा टीझरही रिलीज झाला आहे. याची कथा चोल साम्राज्याशी संबंधित असून टीझरवरून हा चित्रपट जबरदस्त असणार असल्याची चर्चा आहे

या चित्रपटात बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिच्यासह साऊथ स्टार विक्रम, त्रिशा, जयम रवी झळकणार आहे. चित्रपटाच्या धमाकेदार टीझरनंतर आता चाहते चित्रपटाची वाट पाहत आहेत. ‘पोन्नियिन सेल्वन’ हा भारतातील बिग बजेट चित्रपट आहे. त्याचे एकूण बजेट 500 कोटी सांगितले जात आहे. त्याचवेळी ट्रेड अॅनालिस्ट रमेश बाला यांच्या म्हणण्यानुसार, या चित्रपटाचे ऑडिओ हक्क 24 कोटी रुपयांना टिप्सला विकले गेले आहेत.

- Advertisement -

पोन्नियिन सेल्वनचा जबरदस्त टीझर

मणिरत्नम तब्बल चार वर्षांनी दिग्दर्शक म्हणून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. त्यांनी 2018 मध्ये शेवटचा चेक्का चिवंथा वाणम हा चित्रपट रिलीज केला होता. यानंतर आता ते लवकरच नवा ‘पोन्नियिन सेल्वन’ हा चित्रपट प्रक्षेकांच्या भेटीस घेऊन येत आहे. चोल साम्राज्यात सुरू असलेला संघर्ष या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. भारतातील पिरियड चित्रपटांपैकी हा सर्वोत्कृष्ट चित्रपट मानला जातो.

- Advertisement -

‘पोनियिन सेल्वन’चा टीझर एकदम तगडा आहे. या टीझरमध्ये विक्रम, कीचा सुदीप आणि जयम रवी दिसत आहेत. तसेच मोठी जहाजे, हत्ती-घोडे आणि राजवाडे पाहायला मिळतात. याशिवाय ऐश्वर्या राय बच्चन आणि त्रिशा यांनाही अतिशय सुंदर झलक या टीझरमधून पाहता येतेय. त्यामुळे हा चित्रपट एकदम जबरदस्त असणार यात काही शंका नाही.

‘पोन्नियिन सेल्वन’ चित्रपटाची कथा 10 व्या शतकातील चोल साम्राज्यावर आधारित आहे. यामध्ये कावेरी नदीचा मुलगा ‘पोन्नियिन सेल्वन’ हा भारतीय इतिहासातील सर्वात मोठा शासक होण्यापूर्वीचा राजा चोल बनण्याची कथा दाखवली जाणार आहे. या चित्रपटाला ए आर रहमान याने संगीत दिले आहे. 30 सप्टेंबर 2022 रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.


नात्यातील दुराव्यात पुरुषाला बलात्काराचा आरोपी मानता येणार नाही, केरळ उच्च न्यायालयाचे मत

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -