बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध घराण्यांमध्ये बच्चन कुटुंबाचा समावेश आहे. हे कुटुंब कायम चर्चेत असतं. मध्यंतरी अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या यांच्या नात्यात अंतर आल्याच्या बातम्यांनी जोर धरला होता. येत्या काळात ते दोघे घटस्फोट घेऊन एकमेकांपासून कायमचे वेगळे होणार, असेही बोलले गेले. या चर्चांचा जोर अद्याप कायम होता. अशातच, अभिनेत्री ऐश्वर्या राय- बच्चनने सोशल मीडियावर पती अभिषेक बच्चनसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे आता या चर्चा अफवा होत्या असे समोर येत आहे. (Aishwarya Rai Bachchan shared special post for husband abhishek bachchan)
ऐश्वर्याची पतीसाठी खास पोस्ट
त्याच झालं असं की, 5 फेब्रुवारी रोजी अभिनेता अभिषेक बच्चनचा 49 वा वाढदिवस होता. यानिमित्त मित्र- मैत्रिणी आणि चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. ज्यामध्ये अभिनेत्याच्या पत्नीचाही समावेश आहे. अभिषेकच्या वाढदिवसानिमित्त ऐश्वर्याने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने अभिषेकचा लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत ऐश्वर्याने पती अभिषेकला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारं कॅप्शन लिहिलं आहे.
View this post on Instagram
या फोटोसोबत ऐश्वर्याने लिहिलंय, ‘वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुला आनंद, चांगले आरोग्य आणि प्रेम लाभो. गॉड ब्लेस यू!’ ऐश्वर्याने शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मुख्य म्हणजे, ऐश्वर्याच्या वाढदिवशी अभिषेकने कोणतीही पोस्ट शेअर केली नव्हती. ज्यामुळे या जोडप्यात काहीतरी बिनसल्याच्या चर्चांना हवा मिळाली. मात्र, ऐश्वर्याने केलेल्या पोस्टनंतर सर्व चर्चा थंड पडल्या आहेत. या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंट्सदेखील केल्या आहेत.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
ऐश्वर्याची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर यावर अनेकांनी कमेंट्स केल्या. यापैकी एकाने लिहिलंय, ‘आता कुठे गेल्या घटस्फोटाच्या अफवा?’. तर आणखी एकाने लिहिलं, ‘मोठा झालेला अभिषेक आवडला नसेल.. म्हणून लहान अभिषेकचा फोटो शेअर केला आहे’. तसेच अन्य एकाने म्हटलंय, ‘सो क्यूट’ तर एका नेटकऱ्याने असेही म्हटले, ‘आपल्या आयुष्यात काय घडत आहे याची पर्वा न करता ही महिला तिच्या औदार्याला कायम ठेवण्यात कधीचं अपयशी ठरलेली नाही’. याशिवाय अनेकांनी कमेंट्स बॉक्समध्ये अभिषेकला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
घटस्फोटाच्या चर्चांना विराम
या पोस्टमुळे ऐश्वर्या आणि अभिषेकच्या नात्याविषयी पसरणाऱ्या अफवांवर कुठेतरी रोख लागताना दिसतोय. मध्यंतरी या जोडप्यात भांडणं सुरु असल्याच्या आणि त्यांचा घटस्फोट होणार असल्याच्या अफवा उठल्या होत्या. अनेक ठिकाणी हे जोडपं एकत्र स्पॉट होऊनही त्यांच्या नात्यात प्रॉब्लेम असल्याचे बोलले गेले. पण ऐश्वर्याच्या एका पोस्टने असं काहीही नसून त्यांचं नातं व्यवस्थित आहे, हे स्पष्ट केलंय.
हेही पहा –
Nikhil Chavan : ऑल द बेस्ट नाटकातून निखिल चव्हाणची रंगभूमीवर हवा