ऐश्वर्या राय बच्चनचा ‘पोन्नियिन सेलवन पार्ट 1’ चित्रपटातील पहिला लूक रिव्हिल

नुकतंच या चित्रपटाच्या निर्मात्यांनी ट्वीटर अकाऊंटवर ऐश्वर्या राय बच्चनचा पहिला लूक रिव्हिल केला आहे

बॉलिवूडची ब्यूटी क्वीन ऐश्वर्या राय बच्चन आता पुन्हा एकदा आपल्या नव्या भूमिकेत सज्ज होणार आहे. मणि रत्नमचा आगामी चित्रपट ‘पोन्नियिन सेलवन पार्ट 1’ या चित्रपटातील ऐश्वर्याचा पहिला लूक रिव्हिल करण्यात आला आहे. हा शेअर करण्यात आलेला लूक पाहून प्रेक्षकांना भूरळ पडली आहे.

ऐश्वर्याचा राणीच्या विशेषातील लूक रिव्हिल

नुकतंच या चित्रपटाच्या निर्मात्यांनी ट्वीटर अकाऊंटवर ऐश्वर्या राय बच्चनचा पहिला लूक रिव्हिल केला आहे. तसेच खाली कॅप्शनमध्ये लिहिलंय की, प्रतिशोधाचा एक सुंदर चेहरा, भेटा पझुवूरची राणी नंदिनीला. ‘पोन्नियिन सेलवन पार्ट 1’ या चित्रपटामध्ये ऐश्वर्याने राणी नंदिनी ही भूमिका साकारलेली आहे. ऐश्वर्याच्या या रिवीज झालेल्या लूकमध्ये तिने केशरी रंगाची रेशमी साडी नेसलेली असून गळ्यात सुंदर हार परिधान केलेला आहे, तर कानात सुंदर झुमके घातलेले आहेत. ऐश्वर्याचा हा लूक पाहून चाहत्यांना भूरळ पडली आहे.

या दिवशी होणार चित्रपट रिलीज
दिग्दर्शक मणिरत्नम यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन व्यतिरिक्त साउथ चे दिग्गज कलाकार विक्रम आणि कार्तिक सुद्धा मुख्य भूमिकेत असणार आहेत. ३० सप्टेंबर रोजी हा चित्रपट रिलीज होणार असून हा हिंदी, तमिळ, कन्नड, मल्याळम भाषांमध्ये रिलीज होणार आहे.


हेही वाचा :आरोह वेलणकरचा संजय राऊत यांना टोला, म्हणाला राऊत अजून…