घरमनोरंजनऐश्वर्या राय बच्चनचा 'पोन्नियिन सेल्वन 2' 'या' दिवशी होणार प्रदर्शित

ऐश्वर्या राय बच्चनचा ‘पोन्नियिन सेल्वन 2’ ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि तमिळ सुपरस्टार चियान विक्रम यांचा नुकत्याच काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘पोन्नियिन सेल्वन’ चित्रपटाने प्रेक्षकांचे मन जिंकले. या चित्रपटाच्या पहिल्या भागाने देशभरामध्ये यश संपादन केलं आणि जगभरातून उत्तम कमाई केली. या चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर आता लवकरच त्याचा दुसरा भाग देखील प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक मणिरत्नम यांनी याआधीच चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित होईल अशी घोषणा केली होती. सोबतच त्यांनी दुसऱ्या भागाचे शूटिंग देखील आधीच पूर्ण करुन घेतले होते.

चित्रपटाच्या पहिल्या भागाला निर्मात्यांनी प्रदर्शित करताच प्रेक्षकांनी चित्रपटाला उत्तम प्रतिसाद दिला. 30 सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. दरम्यान, आता प्रेक्षक या चित्रपटाचा पुढचा भाग पाहण्यासाठी खूप उत्सुक झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ‘पोन्नियिन सेल्वन 2’ 28 एप्रिल 2023 मध्ये प्रदर्शित होऊ शकतो.

- Advertisement -

ओटीटीवर प्रदर्शित झाला ‘पोन्नियिन सेल्वन’
चोल साम्राज्यावर आधारित असलेल्या ‘पोन्नियिन सेल्वन’ चित्रपट आता अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नडमध्ये प्रदर्शित झाला आहे. मात्र, हा चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला 199 रुपये शुल्क आकारावे लागतील. कारण हा चित्रपट अॅमेझॉन प्राईम रेंडलवर प्रदर्शित होणार आहे. 4 नोव्हेंबर 2022, पासून हा चित्रपट प्रेक्षकांसाठी उपलब्ध झाला आहे.

काय आहे चित्रपटाची कथा
‘पोन्नियिन सेल्वन’ चित्रपटाची कथा 10 व्या शतकातील चोल साम्राज्यावर आधारित आहे. यामध्ये कावेरी नदीचा मुलगा ‘पोन्नियिन सेल्वन’ हा भारतीय इतिहासातील सर्वात मोठा शासक होण्यापूर्वीचा राजा चोल बनण्याची कथा दाखवली जाणार आहे. या चित्रपटाला ए आर रहमान याने संगीत दिले आहे. 30 सप्टेंबर 2022 रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा :

लवकरच ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार ‘पोन्नियिन सेल्वन’

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -