Maharashtra Assembly Election 2024
घरमनोरंजनAishwarya Abhishek News : आराध्याच्या बर्थडे पार्टीत अभिषेक नाही!, ऐश्वर्याने एकटीने केलं...

Aishwarya Abhishek News : आराध्याच्या बर्थडे पार्टीत अभिषेक नाही!, ऐश्वर्याने एकटीने केलं सेलिब्रेशन

Subscribe

Aishwarya Rai Bachchan : अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेत बच्चन यांच्या घटस्फोटाच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत आहेत. मात्र, दोघांनी अजूनही यावर मौन बाळगले आहे. मात्र आता ऐश्वर्या रायने नुकतेच आराध्याच्या वाढदिवसाचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत. आराध्याचा वाढदिवस 16 नोव्हेंबरला साजरा झाला. अशात ऐश्वर्याने तिच्या वडिलांच्या जयंतीनिमित्त मुलगी आणि बाबा दोघांसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. मुलगी आराध्याचा वाढदिवस आणि वडील कृष्णराज राय यांचा जन्मदिवस साजरा करतानाचे हे फोटो आहेत. या फोटोंमध्ये मात्र ऐश्वर्या पती आणि आराध्याचे वडील अभिषेक बच्चन कुठेच दिसत नाही.

ऐश्वर्याने तिच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त तिच्या मुलीचे न पाहिलेले फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये आराध्याच्या लहानपणापासून ते आत्तापर्यंतची झलक पाहायला मिळाली आहे. फोटोंसोबत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “माझे बाबा आणि मुलगी आराध्या दोघांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुम्ही कायम माझ्या हृदयात आहात”, असं कॅप्शन लिहित तिनं यावर हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. ऐश्वर्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स आणि हार्ट इमोजीचा वर्षाव केला आहे.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्याच्या वैवाहिक जीवनाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. त्यात ऐश्वर्याने आराध्याच्या वाढदिवसाचे काही फोटो पोस्ट केलेत. यामध्ये अभिषेक बच्चन दिसत नाही, त्यामुळे हे दोघेही विभक्त होणार अशी चर्चा पुन्हा एकदा जोर धरत आहे. तसेच अभिषेक बच्चन ‘दसवी’ या चित्रपटातील सहकलाकार निम्रत कौरबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरू आहेत. असे असले तरी अभिषेक आणि ऐश्वर्या दोघांनीही अद्याप या चर्चांवर आपलं मत व्यक्त केलेलं नाही.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -