घरट्रेंडिंगVideo - आणि म्हणून व्हायरल होतोय ऐश्वर्याचा 'तो' जूना व्हीडिओ!

Video – आणि म्हणून व्हायरल होतोय ऐश्वर्याचा ‘तो’ जूना व्हीडिओ!

Subscribe

अनेकांना तिचा हा व्हिडीओ आवडला असून त्यांनी व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

बॉलिवूडची ब्यूटी क्वीन ऐश्वर्या राय बच्चन सध्या बॉलिवूडपासून लांब आहे. पण आजही ऐश्वर्याच्या लोकप्रियता जराही कमी झाली नाही. आजही तीच्या व्हीडिओला, फोटोला सोशल मीडियावर तुफान लाईक्स मिळतात. बॉलिवूडची ब्यूटी क्वीन ऐश्वर्या राय बच्चन सध्या चित्रपटांपासून लांब असली तरी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ती सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. सध्या ऐश्वर्याचा स्टेजवर डान्स करतानाचा जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे.

- Advertisement -

हा व्हीडिओ एक अँवॉर्ड शोमधील आहे. सध्या हा व्हीडिओ सोशल मीडियावर ट्रेडिंग आहे. तसेच ती ‘गुजारिश’ या तिच्या चित्रपटातील ‘उडी-उडी’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. अनेकांना तिचा हा व्हिडीओ आवडला असून त्यांनी व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. सोशल मीडियावर अचानक ऐश्वर्याचा हा थ्रोबॅक व्हिडीओ व्हायरल होऊ लागला. काही वेळातच दोन लाखापेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला. एका फॅनपेजने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

सध्या सोशल मीडियावर जुने व्हिडीओ आणि फोटो शेअर करण्याचा ट्रेंड सुरु झाला आहे. यामध्ये आता ऐश्वर्याचा हा जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – Tiktok- लॉकडाऊनमधला नवा ट्रेंड; तुम्ही स्वीकारणार का हे #Flexible Challenge


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -