Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन राजामौलींच्या पुढील चित्रपटात ऐश्वर्या राय मुख्य भूमिकेत? लवकरच दिसणार 'या' चित्रपटात

राजामौलींच्या पुढील चित्रपटात ऐश्वर्या राय मुख्य भूमिकेत? लवकरच दिसणार ‘या’ चित्रपटात

Subscribe

बॉलिवूडची अभिनेत्री ऐश्वर्या राय लवकरच एस एस राजामौली यांच्या चित्रपटामध्ये दिसण्याची शक्यता सांगितली जात आहे

साउथ दिग्दर्शक एस एस राजामौली आपल्या भव्य दिव्य चित्रपटांमुळे चर्चेत असतात. नुकत्याच काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला ‘आरआरआर’ चित्रपटाने जगभरातील प्रेक्षकांना भुरळ पाडली होती. शिवाय या चित्रपटाने बॉक्स ऑफसवर देखील चांगलाच गल्ला जमावला होता. राजामौलींच्या ‘आरआरआर’ आणि ‘बाहुबली’ चित्रपटाच्या दोन्ही पार्टने भरघोस कमाई केली होती. या चित्रपटांनी असे रेकॉर्ड तयार केले आहेत ज्याला बॉलिवूडमधील कोणताच चित्रपट तोडू शकत नाही. याचं दरम्यान अशी बातमी समोर येत आहे की, एस एस राजामौली आता लवकरच बॉलिवूडच्या या दिग्गज अभिनेत्रीसोबत काम करणार आहेत. ज्याची चर्चा आता सर्वत्र होत आहे.

एस एस राजामौलींच्या चित्रपटात ऐश्वर्या राय
बॉलिवूडची अभिनेत्री ऐश्वर्या राय लवकरच एस एस राजामौली यांच्या चित्रपटामध्ये दिसण्याची शक्यता सांगितली जात आहे. मात्र याबाबत अजून कोणतीही अधिकृत बातमी समोर आली नाही, परंतु ही बातमी समोर येताच दोघांचेही चाहते उत्सुक झाले आहेत. माहितीनुसार ऐश्वर्या रायने अनेक साउथ चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. इतकचं नव्हे तर अभिनयाची खरी सुरुवात ऐश्वर्याने साउथ चित्रपटातूनच केली होती.

- Advertisement -

या चित्रपटात दिसणार ऐश्वर्या

 बऱ्याच वर्षांनंतर ऐश्वर्या पुन्हा अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे, ऐश्वर्या राय लवकरच साउथमधील ‘पोन्नियिन सेलवन’ चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या पूर्वीच तिच्या या चित्रपटाचा लूक सोशल मीडियावर शेअर झाला होता. या चित्रपटाचे दोन भाग तयार करण्यात येणार आहेत.या चित्रपटानंतर ऐश्वर्या रजनीकांतच्या ‘169’ मध्ये दिसणार आहे. याआधी ऐश्वर्या राय रजनीकांतच्या ‘रोबोट’ चित्रपटामध्ये दिसली होती.

- Advertisement -

 

 

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -