Aishwarya Rai Drops Bachchan Surname: बॉलीवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक म्हणजे ऐश्वर्या राय. तिच्या अभिनयाचे, सौंदर्याचे जगभरात चाहते आहेत. तिने आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ऐश्वर्या तिच्या कामामुळे नाही तर वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. सध्या त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु आहे. या चर्चांवर अद्याप दोघांनी प्रतिक्रिया दिली नाही आहे अशातच दुबईतील एका इव्हेंटमधील व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत नेमकं काय आहे ? ते जाणून घेऊयात.
ऐश्वर्या राय नुकतीच दुबईतील ग्लोबल वुमेन फोरम कार्यक्रमात सहभागी झाली. यात तिने महिला सशक्तीकरणाबद्दल तिची मतं मांडली. या कार्यक्रमात ऐश्वर्या निळ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान करून गेली होती. यावर तिने नक्षीदार जॅकेट घातलं होतं. ऐश्वर्याचा या इव्हेंटमधील एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये ऐश्वर्या मंचावर येताच मोठ्या स्क्रीनवर तिचं नाव दिसतं. मात्र त्यात बच्चन हे तिचं आडनाव नव्हतं. ‘ऐश्वर्या राय’ व ‘इंटरनॅशनल स्टार’ असं तिथे लिहिलं होतं. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर ऐश्वर्याच्या नावामागे बच्चन आडनाव नाही, याकडे लोकांचं लक्ष वेधलं गेलं.
View this post on Instagram
नुकताच आराध्याचा 13 वा वाढदिवस झाला. या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही फोटो ऐश्वर्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. पण या फोटोंमध्ये अभिषेक बच्चन किंवा कुटुंबातील इतर कोणतेही सदस्य नव्हते, त्यामुळे या जोडप्याच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलंय.
दरम्यान 20 एप्रिल 2007 रोजी अभिषेक आणि ऐश्वर्या विवाहबंधनात अडकले होते. 2011 मध्ये या जोडप्याने त्यांच्या पहिल्या मुलीचे स्वागत केले. आता दोघांच्या लग्नाला 17 वर्ष पुर्ण झाली आहेत. त्यानंतर दोघेही विभक्त होणार असल्याची चर्चा सुरू आहे.