घरमनोरंजनअभिषेकवर रागावली ऐश्वर्या; व्हिडिओ व्हायरल

अभिषेकवर रागावली ऐश्वर्या; व्हिडिओ व्हायरल

Subscribe

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायला बॉलिवूडमधील परफेक्ट कपल म्हणून पाहिलं जातं. दोघांच्या लग्नाला बरेच वर्ष झाले. अनेकदा त्यांच्यातील प्रेम अनेक कार्यक्रमांमध्ये पाहायला मिळते. सार्वजनिक ठिकाणी एखादी प्रसिद्ध जोडी एकमेकांवर रागावलेली क्वचितच पाहायल मिळते. सध्या सोशल मीडियावर अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायचा असाच एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय ज्यात ऐश्वर्या अभिषेकवर एखाद्या गोष्टीवरुन रागावलेली असून अभिषेकवर चिडताना दिसत आहे.

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायचा व्हिडीओ व्हायरल

Aishwarya rolls eyes at Abhishek then snaps at Navya 🤣 🤣
by u/asamshah in BollyBlindsNGossip

- Advertisement -

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनच्या या व्हिडिओमध्ये ऐश्वर्या, अभिषेक, आराध्या, नव्या आणि सिकंदर खेर कबड्डीचा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये बसलेले दिसत आहेत. यादरम्यान, ऐश्वर्या अभिषेकवर रागावताना दिसते. ऐश्वर्या अभिषेकला काहीतरी म्हणते आणि त्यानंतर त्याच्या चेहऱ्याचे हावभाव बदलतात. तर दुसरीकडे ऐश्वर्याच्या शेजारी बसलेली आराध्या आई-वडिलांच्या भांडणामुळे नाराज दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये दिसतंय की, नव्या ऐश्वर्याशी बोलते आणि नंतर विचित्र प्रतिक्रिया देते. मात्र, हे प्रकरण नक्की काय आहे आणि कसली चर्चा सुरू आहे, हे कोणालाच माहीत नाही. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडिया यूजर्सने जोक्स करायला सुरुवात केली आहे. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिलंय की, “सिकंदर खेरसाठी अस्ताव्यस्त क्षण”. तर दुसर्‍याने लिहिले आहे की, “सिकंदर मला इथून बाहेर काढा म्हणत असेल”.

- Advertisement -

 


हेही वाचा : 

सुष्मिता सेनला ‘आर्या 3’ शूटिंग दरम्यान आला Heart Attack

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -