माजी विश्वसुंदरी आणि बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सध्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये किंचीतच झळकते. चित्रपट कमी केलेल्याने देखील ऐश्वर्या नेहेमीच विविध कारणामुळे चर्चेत असते. ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा गरोदर असल्याची बातमी मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. ऐश्वर्याने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केल्यामुळे ही बातमी व्हायरल झाली होती. मात्र याबाबत ऐश्वर्याला विचारले असता तिने या माहितीचे खंडन केले आहे. ऐश्वर्या पुन्हा गरोदर असल्याची बातमी फक्त अफवा असल्याचे तिच्या प्रवक्त्यांनी सांगितले आहे. ऐश्वर्याला सध्या एक मुलगी आहे जीचे नाव आराध्या बच्चन आहे. या अफवेमुळे ऐश्वर्याच्या फॅन्समध्ये चांगलीच चर्चा रंगील होती.
हे आहे कारण
बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही सध्या आपले पती अभिषेक बच्चन सोबत सुट्टीवर आहे. सध्या ही जोडी गोव्यामध्ये आहे. ऐश्वर्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटमध्ये ती अभिषेक आणि ऐश्वर्या बीचवर फिरत आहेत. मात्र तिचे पोट बाहेर आलेले दिसल्यामुळे ऐश्वर्या पून्हा गरोदर असल्याची अफवा पसरली होती.