कान्समधील लूकवरून ऐश्वर्या ट्रोल, जादू बरोबर तुलना

76 वा कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 सुरू झाला आहे. फ्रेंच रिव्हिएरामधील रेड कार्पेटवर जगभरातील अनेक कलाकारांनी आपली झलक दाखवतात. यादरम्यान हॉलिवूड इंडस्ट्रीपासून बॉलिवूडपर्यंतच्या अनेक सौंदर्यवतींनी देखील कान्समध्ये सहभागी होतात. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन देखील मागील 21 वर्षांपासून कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर हजेरी लावते. प्रत्येकवर्षी ऐश्वर्या विविध लूकमध्ये दिसते. यंदा देखील ऐश्वर्याने काही अनोखे लूक केले आहेत.

18 मे रोजी कान्समध्ये ऐश्वर्याने ब्लॅक आणि सिलव्हर गाऊनमध्ये दिसली. ऐश्वर्याचा हा लूक सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. शिवाय या लूकवर अनेकजण मिम्स देखील तयार करत आहेत. काही नेटकऱ्यांनी ऐश्वर्याच्या या लूकची तुलना ऋतिक रोशनच्या ‘कोई मिल गया’तील जादूसोबत केली आहे.

ऐश्वर्याच्या लूकची सोशल मीडियावर खिल्ली

कान्स फिल्म फेस्टिवलसाठी ऐश्वर्या नेहमी हटके लूक करुन चाहत्यांना भुरळ पाडते. मात्र, यावेळचा ऐश्वर्याचा हा लूक पाहून चाहते तिची सोशल मीडियावर खिल्ली उडवू लागले आहेत. शिवाय अनेकांनी तिला ट्रोलही केलं आहे.

सोशल मीडियावर एका नेटकऱ्याने ऐश्वर्याच्या या लूकची तुलना ऋतिक रोशनच्या ‘कोई मिल गया’तील जादूसोबत केली आहे.

तर दुसऱ्या नेटकऱ्याने एक फोटो शेअर करत लिहिलंय की, ऐश्वर्या रायला या लूकची प्रेरणा ज्याच्याकडून मिळाली, तो आता सापडला आहे.”

तर आणखी एकाने तिच्या हेअरस्टाईलवर कमेंट करत लिहिलंय एका यूजरने लिहिलंय की, “मॅडम, जर तुम्ही रेड कार्पेटवर चालत असाल तर मी तुम्हाला तुमची हेअरस्टाईल बदलण्याची नम्र विनंती करतो, कारण गेल्या 1 वर्षांपासून तुमची हिच हेअरस्टाईल आहे. तुम्ही श्रीमंत आणि सुंदर आहात, तुम्ही या हेअरस्टाईलमुळे तुमचे सौंदर्य लपवत आहात का?”


हेही वाचा :

आलियानंतर सासू नीतू कपूर यांनीही खरेदी केलं नवं घर