घरमनोरंजनथिएटरमध्ये झळकताच पहिल्या दिवशी अजय देवणचा 'भोला' झाला ऑनलाइन लीक

थिएटरमध्ये झळकताच पहिल्या दिवशी अजय देवणचा ‘भोला’ झाला ऑनलाइन लीक

Subscribe

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा बहुप्रतिक्षीत ‘भोला’ चित्रपट आज रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर सर्वत्र प्रदर्शित करण्यात आला. मागील अनेक दिवसांपासून या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला देखील उत्तम प्रतिसाद होता. दरम्यान, अशातच नुकताच प्रदर्शित झालेला हा चित्रपट काही वेळात ऑनलाईन लीक झाल्याची वाईट बातमी समोर येत आहे.

आज प्रदर्शित झालेल्या ‘भोला’ चित्रपटाला प्रेक्षक मध्यम प्रतिसाद देत आहेत. या चित्रपटाचं बजेट 100 कोटी असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, आता हा ऑनलाईन लीक झाल्याने चित्रपटातील कलाकार आणि निर्मित्यांची काळजी वाढली आहे.

- Advertisement -

याबाबत स्वतः अजय देवगणने आपली प्रतिक्रिया दिली आहे. ज्यात त्याने लिहिलंय की, “पायरसी करणारा सैतान बनू नका, तिकिट खरेदी करून चित्रपट पाहणारे रॉक व्हा!” असं अजय म्हणाला.

दरम्यान, याआधी देखील रणबीर कपूरचा ‘तू झूठी मै मक्कार’ आणि शाहरुख खानचा ‘पठाण’ अशाप्रकारेच ऑनलाईन लीक करण्यात आला होता.

- Advertisement -

काय आहे ‘भोला’ चित्रपटाची कथा?

‘भोला’ चित्रपटात अभिनेता अजय देवगण एका रक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेत्री तब्बूही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘भोला’ हा तमिळ चित्रपट ‘कैथी’चा रिमेक आहे. ‘दृश्यम 2’ नंतर या चित्रपटाद्वारे आता अजय आणि तब्बूची जोडी 9व्यांदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे.

 


हेही वाचा :

रणबीरच्या ‘तू झूठी मैं मक्कार’ ने हॉलिवूड चित्रपट ‘जॉन विक – चॅप्टर 4’ला टाकलं मागे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -