Gangubai Kathiawadi trailer आधीच आला अजय देवगणचा लूक, म्हणाला- येतोय आम्ही

अजय देवगण या चित्रपटात गुंडाची भूमिका साकारणार आहे.

ajay devgan poster out from gangubai kathiawadi trailer
Gangubai Kathiawadi trailer आधीच आला अजय देवगणचा लूक, म्हणाला- येतोय आम्ही

बॉलिवूडचा बहुप्रतिक्षित ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटातील अभिनेता अजय देवगणचा फर्स्ट लूक नुकताच रिलीज झाला आहे, डोक्यावर टोपी, व्हाइट पॅन्ट-शर्ट आणि हलक्या रंगाचा ब्लेझरमधील अजय देवगणचा लूक खूपच इंटेन्स दिसत होता. या पोस्टरमध्ये अजय देवगण सलाम करताना दिसतोय. या चित्रपटाचा ट्रेलर 4 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

मात्र चित्रपटाच्या रिलीजआधीच चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून येतेय. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगण आलिया भट्टसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

आलिया भट्टचा लूकही आउट

अजय देवगण यावेळी ‘गंगूबाई काठियावाडी’मध्ये एका वेगळ्या भूमिकेत झळकणार आहे. अलीकडेच संजय लीला भन्साळी प्रॉडक्शनने चित्रपटातील महिला डॉनची भूमिका साकारणाऱ्या आलिया भट्टचा लूक रिलीज केला आहे. आणि आता अजय देवगणचा हा लूक पाहून चाहत्यांची उत्सुकता अजूनचं वाढली आहे.

25 फेब्रुवारीला रिलीज होणार चित्रपट

अनेकवेळा चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलल्यानंतर आता निर्मात्यांनी 25 फेब्रुवारीला चित्रपट रिलीज करण्याचे ठरवले आहे. प्रॉडक्शन हाऊसकडून सांगण्यात आले की, चित्रपटाचा ट्रेलर ४ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे, तर चाहत्यांना जास्त वाट पाहावी लागणार नाही, हा चित्रपट २५ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

त्याचबरोबर अजय देवगण या चित्रपटात गुंडाची भूमिका साकारणार आहे. गंगूबाई हा व्यवसाय शिकवते तेव्हा तो तिच्या गंगुबाईच्या प्रेमात पडतो. क्राईम ड्रामामध्ये गंगूबाईला एका सेक्स वर्करच्या भूमिकेत दाखवण्यात आले आहे जी नंतर मुंबईत अंडरवर्ल्ड डॉन म्हणून उदयास आली.


लै गुपितं उलगडायची हायेत…,kiran Mane यांची 4 फेब्रुवारीला मुंबईत पत्रकार परिषद