घरताज्या घडामोडीमहिनाभर नखे कापली नाही, ४१ दिवसांच्या कडक व्रतानंतर Ajay Devgan शबरीमालाच्या दर्शनाला

महिनाभर नखे कापली नाही, ४१ दिवसांच्या कडक व्रतानंतर Ajay Devgan शबरीमालाच्या दर्शनाला

Subscribe

मंदिरात दर्शनसाठी येण्यासाठी 41 दिवसांचे कठीण व्रत करावे लागते. या दिवसात देवाची साधना, सन्यासी जीवन जगावे लागते. 41 दिवस अजय देवगणने केवळ शाकाहारी जेवणाचे सेवन केले.

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचे (Ajay Devgan)  काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अजयने नुकतेच शबरीमाला मंदिरात अयप्पा स्वामींचे (kerala sabarimala temple ) दर्शन घेतले. ४१ दिवसांच्या कडक व्रतांतर अजय देवगण डोक्यावर इरुमूडी घेऊन सन्निधानम शबरीमाला येथे गेला. अजय देवगणचे या मंदिरातील काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. ज्यात अजयने काळे कपडे घातलेत, तोंडावर काळा मास्क आणि मंदिरात पूजा करताना अजय दिसत आहे.

- Advertisement -

सांगितले जात आहे की अजय देवगणने भगवान अय्यपांच्या दर्शनासाठी41 दिवसांचे कठीण व्रत हाती घेतले होते. रोज काळे कपडे घालणे, ब्रम्हचर्य जीवनाचे पालन करणे, विना चप्पल चालणे, जमिनीवर झोपणे, दररोज संध्याकाळी पूजा करणे आणि गळ्यात तुळशीच्या माळा घालणे असे सगळे नियम अजय पाळत होता.  सगळ्या नियमांचे पालन करुन ते व्रत पूर्ण केल्याने अजयला शबरीमाला मंदिरात दर्शन घेता आले.

काय आहेत शबरीमाला मंदिरात दर्शनाचे नियम

- Advertisement -

केरळमध्ये असलेल्या शबरीमाला मंदिरात दर्शनासाठी जाण्यासाठी काही नियम आहेत. शबरीमाला मंदिर हे केवळ नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यात दर्शनासाठी खुले असते. मंदिरात दर्शनसाठी येण्यासाठी 41 दिवसांचे कठीण व्रत करावे लागते. या दिवसात देवाची साधना, सन्यासी जीवन जगावे लागते. 41 दिवस अजय देवगणने केवळ शाकाहारी जेवणाचे सेवन केले. हे व्रत केल्यानंतर शबरीमाला मंदिरात श्रद्धाळू लोक पोटली घेऊन जातात. ज्याला ‘इरुमूड’ असे म्हणातात. अजय देवगण देखील एका फोटोमध्ये डोक्यावर इरुमूड घेऊन दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

अजय देखील या यात्रेचा व्हिडीओ शेअर केलाय ज्यात तो स्टायलिश अंदाजात दिसत आहे. स्वामिये सरणम अयप्पा असे म्हणत अजयने हा व्हिडीओ शेअर केला आहे.

अजयच्या वर्क फ्रंटविषयी बोलायचे झाले तर अजय देवगण निर्माता लोकेश कनगराज यांच्या ‘कैथी’ या हिंदी रिमेक सिनेमात दिसणार आहे. ‘भोला’ असे या सिनेमाचे नाव आहे. सिनेमाच्या शुटींगला सुरुवात झाली असून अजयने शेअर केलेला व्हिडीओ हा शबरीमाला नाही त्याच्या सेटवरील असल्याच्या प्रतिक्रीया येत आहेत.


हेही वाचा – Malaika Arora आणि Arjun Kapoorचा खरंच ब्रेकअप झालाय? पोस्ट लिहून केला खुलासा

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -