घरमनोरंजनAjay Devgan Birthday : अजय देवगणचे हे चित्रपट येणार प्रेश्रकांच्या भेटीला

Ajay Devgan Birthday : अजय देवगणचे हे चित्रपट येणार प्रेश्रकांच्या भेटीला

Subscribe

बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता अजय देवगणला तुम्ही अनेक ॲक्शन चित्रपटांमध्ये काम करताना पाहिले असेल. अजयनं आपल्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. आपल्या अभिनयानं त्यानं बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अजय आज 2 एप्रिल रोजी त्याचा 55 वा वाढदिवस साजरा करत आहे. अजयनं 1991 मध्ये आलेल्या ‘फूल और कांटे’ या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली होती. अजय देवगणचा नुकताच ‘शैतान’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आहे. आता पुढे अजय अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. आज अजयच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल जाणून घेऊया.

सिंघम अगेन

रोहित शेट्टीच्या सिंघम या प्रसिद्ध चित्रपटाचे पहिले दोन भाग प्रेक्षकांना खूप आवडले होते. पहिल्या दोन भागात अजय देवगणने आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत. त्यामुळेच तिसरा भागही याच वर्षी १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. यावेळी अजय देवगण व्यतिरिक्त अक्षय कुमार, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण आणि टायगर श्रॉफ देखील या चित्रपटाचा भाग असणार आहेत.

- Advertisement -

औरों में कहां दम था

और में कहाँ दम था हा आगामी बॉलीवूड ड्रामा आहे. अजय देवगण आणि तब्बूची जोडी याआधीही मोठ्या पडद्यावर खूप आवडली आहे. अशा परिस्थितीत अजय देवगणच्या आगामी चित्रपटात ही जोडी एकत्र दिसणार आहे. अजय देवगणचा हा चित्रपट 26 एप्रिल 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. याचे दिग्दर्शन नीरज पांडे करत आहेत.

गोलमाल 5

प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या ब्लॉकबस्टर गोलमाल फ्रँचायझीचे चार चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. आता प्रेक्षक त्याच्या पाचव्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या प्रत्येक भागात अजय देवगण दिसला आहे. अजय देवगणने सर्व भागांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. अलीकडेच, पिंकव्हिलाशी संवाद साधताना रोहित शेट्टी म्हणाला होता की ‘गोलमाल 5’ नक्कीच बनणार आहे. मात्र या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत त्यांनी काहीही सांगितले नाही.

- Advertisement -

मैदान

अभिनेता अजय देवगण आजकाल त्याच्या ‘मैदान’ या स्पोर्ट्स बायोग्राफी चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 10 एप्रिल 2024 रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे. अजय देवगण स्टारर हा चित्रपट फुटबॉल प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांच्यावर आधारित आहे. अजय बोनी कपूर, आकाश चावला, अरुणव जॉय सेनगुप्ता आणि झी स्टुडिओ निर्मित या चित्रपटात प्रियामणी, रुद्रनील घोष आणि गजराज राव यांच्याही भूमिका आहेत.

रेड 2

अजय देवगणच्या आगामी चित्रपटांच्या यादीत ‘रेड 2’चे नावही आहे. हा चित्रपट 15 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अजय व्यतिरिक्त रितेश देशमुख आणि वाणी कपूर दिसणार आहेत.

दे दे प्यार दे 2

अजय देवगण अभिनीत ‘दे दे प्यार दे 2’ 1 मे 2025 रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अंशुल शर्मा करणार आहे. या चित्रपटामध्ये अजयबरोबर अभिनेत्री रकुल प्रीत सिंग दिसेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -