बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री तब्बू यांची मुख्य भूमिका असणारा ‘दृश्यम 2’ मागील अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. नुकताच हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. अवघ्या दोन दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कल्ला करायला सुरुवात केली आहे.
अजय देवगणच्या ‘दृश्यम 2’ने कमावला करोडोंचा गल्ला
All estimations and calculations go for a toss… #Drishyam2 is SENSATIONAL on Day 2… East. West. North. South. The REMARKABLE RUN continues PAN-#India… Multiplexes superb, mass pockets join the party… Fri 15.38 cr, Sat 21.59 cr. Total: ₹ 36.97 cr. #India biz. 🔥🔥🔥 pic.twitter.com/mc8xJdQsD6
— taran adarsh (@taran_adarsh) November 20, 2022
श्रिया सरन, अक्षय खन्ना आणि अजय देवगण यांचा ‘दृश्यम 2’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई केली आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 15.38 कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी 21.59 कोटींची कमाई केली. आत्तापर्यंत या चित्रपटाने एकूण 36.97 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाची वाढती कमाई पाहून निर्माते देखील खूप खूश आहेत.
100 कोटींचा टप्पा पार करण्याची शक्यता
अजय देवगणचा ‘दृश्यम 2’ बाबत सांगितलं जातंय की, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर लवकरच 100 कोटींचा टप्पा देखील पार करु शकतो.
‘दृश्यम’ ने देखील जिंकलं होतं प्रेक्षकांचं मन
बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा ‘दृश्यम’ 2015 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी केले होते. या चित्रपटात श्रिया सरन, इशिता दत्ता, तब्बू दिसून आल्या होत्या. त्यावेळी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई केली होती.
हेही वाचा :