घरमनोरंजनInto the Wild Trailer: बेअर ग्रिल्ससह अजय देवगण करणार महासागरात धाडसी कृत्य

Into the Wild Trailer: बेअर ग्रिल्ससह अजय देवगण करणार महासागरात धाडसी कृत्य

Subscribe

बॉलिवूडचा ‘सिंघम’ अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) लवकरचं ‘Into Wild With Bear Grylls’ या लोकप्रिय शोमध्ये दिसणार आहे. या शोचा नवा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. यामध्ये बेअर ग्रिल्ससह अजय देवगण साहसी संकटांचा सामना करताना दिसत आहे. हिंदी महासागरात एक रोमांचकारी आणि धाडसी प्रवास दोघं पूर्ण करताना दिसणार आहे. अजय देवगणचा हा स्पेशल एपिसोड २२ ऑक्टोबरला डिस्कव्हरी प्लसवर (Discovery +) प्रसारित होणार आहे.

सोशल मीडियावर अजय देवगणने या एपिसोडचा ट्रेलर शेअर केला आहे. अजयने ट्रेलर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, तोपर्यंत तुम्ही जाणार नाही, तोपर्यंत कळणार नाही. त्यामुळे मी हे करुन पाहिले. Bear Grylls सोबत मी हिंद महासागरातील निर्जन बेटांना एक्सप्लोअर केले. हा कोणताही खेळ नाही भावा. Into The Wild मधील अविस्मरणीय प्रवासाची छोटी झलक. २२ ऑक्टोबर रोजी डिस्कवरी प्लसवर आणि २५ ऑक्टोबर रोजी डिस्कवरी चॅनेलवर प्रसारण होणार आहे. अशीही माहिती अजयने दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

- Advertisement -

ट्रेलर पाहून आता चाहत्यांमध्ये या एपिसोडबद्दलची उत्सुकता अधिक वाढली आहे. ट्रेलरमध्ये अजय देवगण बेअर ग्रिल्ससह हिंद महासागराच्या खवळलेल्या लाटांचा सामना करत घनदाट जंगलांमध्ये रोमांचकारी प्रवास करताना दिसतोय. महासागरातील शार्क माशांच्या आसपास दोघेही पोहताना दिसले. तसेच मालदीवच्या घनदाट जंगलात अजय देवगण बेअर ग्रिल्स मिळून संघर्ष करताना दिसले. हा ट्रेलर पाहून चाहत्यांना अधिकचं संघर्षमय प्रवास पाहता येणार आहे.

- Advertisement -

हा एपिसोड सप्टेंबर महिन्यात मालदीवमध्ये शूट करण्यात आला होता. मालदीवमध्ये अजय देवगण सोबत त्याचा मुलगा युग आणि टीम उपस्थित होती. अजय देवगण याच्या चित्रपटांच्या धमाकेदार ट्रेलरप्रमाणेच हा ट्रेलर पाहायला मिळतोय. अजय देवगणमध्ये हा काही खेळ नाही भावा असं सांगताना दिसतोय, तर बेअर ग्रिल्स यावर हा परिसर त्याचा आहे असं सांगताना दिसतोय. शोदरम्याम दोघांनी अनेक वैयक्तिक, करियरसंदर्भात हलक्या फुलक्या चर्चाही केल्यात.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -