घरमनोरंजनAjay Devgn: बॉलीवूडमध्ये येण्यासाठी अजय देवगणने बदलले नाव

Ajay Devgn: बॉलीवूडमध्ये येण्यासाठी अजय देवगणने बदलले नाव

Subscribe

बॉलीवूडचा सिंघम अजय देवगण ( Ajay devgan) आज २ एप्रिलला ५३ वा वाढदिवस साजरा करत आहे.

बॉलीवूडचा सिंघम अजय देवगण ( Ajay devgan) आज २ एप्रिलला ५३ वा वाढदिवस साजरा करत आहे. अजयने जरी वयाची पन्नाशी ओलांडलेली असली तरी बॉलीवूडमधला त्याचा चार्म अजूनही कायम आहे. अजयबदद्ल त्याच्या कुटुंबाबदद्ल अनेक बातम्या येत असतात. पण अजयने बॉलीवूडमध्ये एन्ट्री करण्याआधी आपलं नाव बदलले हे मात्र फारच कमी जणांना माहीत आहे.

आपल्या या ३२ वर्षांच्या फिल्मी करियरमध्ये अजयने अनेक चढ उतार पाहीले आहेत. यामुळे तो नेहमी पाय जमिनीवर ठेऊन असतो. अजयचा पहीला चित्रपट १९९१ साली रिलीज झाला होता. त्याचे नाव होते फूल और कांटे.या चित्रपटाने अजयला रातोरात सुपरस्टार बनवलं. चित्रपटातील अनेक स्टंट त्याने स्वत; केले होते. त्यानंतर अजयने कधी मागे वळून पाहीले नाही. त्याने दमदार चित्रपटाचा सपाटाच लावला. त्यातील दृश्यम,तानाजी असे चित्रपट बनवले. तर दिग्दर्शक रोहीत शेट्टीबरोबर गोलमाल, सिंघम सारखे दमदार अभिनय असलेले चित्रपट केले.

- Advertisement -

पण अजयने बॉलीवूडमध्ये येण्याआधी आपलं नाव बदलले. त्याचे खरं नाव आहे विशाल देवगण. बॉलीवूडमध्ये विशाल हे  नाव हिरोला सुट होत नसल्याने त्याने नाव बदलून अजय असे केले. २००९ मध्ये एका मुलाखतीत अजयनेच नाव बदलल्याचे सांगितले होते. अजय नावात वेगळेपण असल्याने आपण हे नाव कायम केल्याचेही त्याने सांगितले होते. या नावाने त्याला प्रसिद्धी तर दिलीच शिवाय यशही दिले. पण त्यामागे आई वडिलांचे आशिर्वाद आणि मेहनत असल्याचे अजयने अनेकवेळा सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -