घरमनोरंजनVideo: वडिलांच्या आठवणीने अजय देवगण भावूक; शेअर केली पोस्ट

Video: वडिलांच्या आठवणीने अजय देवगण भावूक; शेअर केली पोस्ट

Subscribe

बॉलीवूड अभिनेता अजय देवगण याने आपल्या वडिलांच्या आठवणीत एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अॅक्शन स्टंट करणारे कलाकार वीरू देवगण यांचे गेल्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाला एक वर्ष पूर्ण होत असल्याने अजय देवगण यांनी सोशल मीडियावर त्यांच्या आठवणीला उजाळा दिला आहे. अजयने पोस्टमध्ये म्हटले आहे की, बाबा तुम्हाला जाऊन एक वर्ष झाले. पण तुम्ही अजूनही माझ्यात जीवंत असल्याचे मला जाणवते. माझी काळजी घेणारे, मला सांभाळून घेणारे, असे भासते. सोबत अजयने वडिलांबरोबरच्या फोटोचा व्हिडिओदेखील शेअर केला आहे. यापूर्वी काल अभिनेता रितेश देशमुख याने वडिल दिवंगत विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त भावनिक व्हिडिओ शेअर केला होता.

- Advertisement -

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची काल ७५ वी जयंती होती. अभिनेता रितेश देशमुख याने आपल्या वडिलांच्या जयंतीनिमित्त एक भावनिक व्हिडीओ तयार केली होती. त्याने ट्विटरवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये विलासराव देशमुख यांचे अस्तित्व अद्याप असून विलासरावांच्या पोषाखाला जवळ घेऊन रितेश ते जाणवून घेताना दिसत आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

Video: धर्मेंद्र यांचा फार्म हाऊस वरील ‘हा’ व्हिडिओ झाला व्हायरल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -