घरताज्या घडामोडीVideo : सिंघम अजयचे कोरोनावर गाणं, गाण्यातून घातली नागरिकांना साद

Video : सिंघम अजयचे कोरोनावर गाणं, गाण्यातून घातली नागरिकांना साद

Subscribe

अभिनेता अजय देवगणने कोरोनावर गाणं गायले असून या गाण्यातून त्यांनी नागरिकांना साद घातली आहे.

वुहानमधून जगभर पसरलेल्या कोरोना विषाणूचा विळखा अधिकच घट होताना दिसत आहे. या विषाणूमुळे हजारो लोकांचे बळी गेले आहेत. तसेच लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून देशवासीयांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, अशा प्रतिकूल परिस्थितीत लोकांना प्रेरित करण्यासाठी अभिनेता अजय देवगणने एक गाणे तयार केले आहे.

- Advertisement -

अजय देवगणने तयार केलेल्या गाण्याचे नाव ‘ठहर जा’, असे आहे. तसेच हे गाणे त्यांनी खास कोरोनावर तयार केले असून या गाण्यातून त्यांनी नागरिकांना साद घातली आहे. या गाण्यामध्ये ‘घरात थांबा आणि प्रार्थना करा. आपण एकत्र येऊन या तुफानाचा सामना करु. आनंदी राहा. स्वत:च्या कुटुंबासाठी घरातच थांबा’. अशा आशयाचे ट्विट करुन त्याने या गाण्याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे. लॉकडाऊनच्या काळात घरातच राहण्याचा संदेश अजयने या गाण्याद्वारे देशवासीयांना दिला आहे.

हे गाणे अनिल वर्मा यांनी लिहिले असून गायक मेहुल व्यास याच्या आवाजात हे गाणे स्वरबद्ध झाले असून अजय देवगणच्या या गाण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच अनेकांनी या गाण्यावर अनेकांकडून कौतुकाचा वर्षाव केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – दवाखाना, नर्सिंग होम्स बंद ठेवल्यास महापालिका परवाना रद्द करणार!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -