घरताज्या घडामोडीभारतीय क्रिकेट संघाचा 'तानाजी' विराट कोहली

भारतीय क्रिकेट संघाचा ‘तानाजी’ विराट कोहली

Subscribe

भारतीय क्रिकेट संघाचा 'तानाजी' विराट कोहली आहे, अशी प्रतिक्रिया बॉलिवूड अभिनेता अजय देवगण यांनी दिली आहे.

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ हा नवा चित्रपट येत्या १० जानेवारीला प्रदर्शित होणार असून सध्या अजय त्याच्या बहुप्रतिक्षित चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. या प्रमोशन दरम्यान, अजय देवगणने ‘भारतीय क्रिकेट संघाचा ‘तानाजी’ विराट कोहली’ असल्याचे बोले आहे. स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात नेरोलॅक क्रिकेट लाइव्हवर अजय देवगण आणि काजोल यांनी क्रिकेटविषयी चर्चा करताना अजय देवगणने कोहलीचे कौतुक केले आहे.

- Advertisement -

काय म्हणाला अजय देवगण?

‘विराट कोहली हा भारतीय संघाचा तानाजी असून तो त्याच्यात प्रचंड आत्मविश्वास असून तो कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवू शकतो, असा हा खेळाडू आहे. तसेच त्यांनी यावेळी आपल्या बाबत एक गोष्ट सांगितली, तो म्हणाला की, मी ही फलंदाज होतो. तसेच एकदा क्रिकेट खेळताना मी ज्यावेळी कॅच पकड होतो. त्यावेळी माझ्या करंगळीला देखील मार लागला होतो. ती माझी करंगळी अजूनही वाकलेली आहे’.

- Advertisement -

‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटात अजय देवगणसोबत काजोल आणि सैफ अली खानदेखील दिसणार आहेत. या चित्रपटात काजोल अजय देवगणच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. तर सैफ अली खान चित्रपटात मुख्य खलनायकाच्या भूमिकेत असू शकतो. हा अजय देवगणचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे सांगितले जात आहे.


हेही वाचा – Video : दीपिका पदुकोणचा लक्ष्मी अगरवालसोबत नागिन डान्स


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -