अजय देवगण करणार ‘भोला’ चित्रपटाचे दिग्दर्शन; पोस्ट शेअर करत दिली माहिती

अजय देवगणने एका मुलाखतीत सांगितले की, तो अभिनया बरोबरच आता चित्रपटाचे दिग्दर्शन सुद्धा करणार, तसेच त्याने आत्तापर्यंत तीन चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहेत

मागील काही दिवसांपूर्वी अभिनेता अजय देवगणचा ‘रनवे 34’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिलेला नाही. तसेच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील फारशी कमाई केलेली नाही. त्यामुळे ‘रनवे 34’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला, ओटीटी वर या चित्रपटाला चांगाला प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षक या चित्रपटातील अजय देवगणच्या भूमिकेची नाही तर त्यात्या दिग्दर्शनाचे कौतुक करत आहेत. ‘रनवे 34’ चित्रपटाचे दिग्दर्शन अजय देवगणने केले होते, ज्याचे आता खूप कौतुक होत आहे, त्यामुळे अजय देवगनने आता त्याच्या नव्या भोला चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याता निर्णय घेतला आहे.

अजय देवगणने एका मुलाखतीत सांगितले की, तो अभिनया बरोबरच आता चित्रपटाचे दिग्दर्शन सुद्धा करणार, तसेच त्याने आत्तापर्यंत तीन चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. यावेळी तो त्याच्या चौथ्या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटाचे नाव ‘भोला’ असून हा तमिळ भाषेतील ‘कैथी’ चित्रपटाचा रिमेक आहे.

आता ज्याचे दिग्दर्शन अजय देवगण करणार आहे. याआधी या चित्रपटाचे दिग्दर्शन धर्मेंद्र शर्मा करणार होते, पण आता अजय देवगणने ही जबाबदारी घेतली आहे. तसेच त्याने आता आपल्या सोशल मीडियावर एक फोटो सुद्धा शेअर केला आहे ज्यात त्याने लिहिलंय की, ‘आता अॅक्शन म्हणायची पुन्हा वेळ आली’

‘भोला’ चित्रपटात अजय सोबत असणार तब्बू
19 एप्रिल 2022 रोजी अजयने आपल्या भोला या चित्रपटाची घोषणा केली होती. त्यावेळी त्याने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आणि कास्टबाबत सांगितले होते. ‘भोला’ चित्रपटाशिवाय अजय आणि तब्बू ने ‘दृश्यम’ , ‘दृश्यम 2′ ,’दे दे प्यार दे’ आणि ‘विजयपथ’ चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. हा चित्रपट 30 मार्च 2023 रोजी रिलीज होणार आहे.