Thursday, April 15, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन २१ वर्षानंतर अजय आणि संजय पुन्हा एकत्र, गंगूबाई काठीवाड़ी मध्ये करणार ही...

२१ वर्षानंतर अजय आणि संजय पुन्हा एकत्र, गंगूबाई काठीवाड़ी मध्ये करणार ही भूमिका

बॉलिवूड दिग्दर्शक संजय लिला भंसाली यांचा गंगूबाई काठियावाड़ी हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटात आलिया भट्टही मुख्य भूमिका करणार असून अजय देवगन ही तिच्या सोबत पाहायला मिळणार आहे.

Related Story

- Advertisement -

संजय लिला भंसाली दिग्दर्शित ‘गंगूबाई काठीयावाड़ी’ या चित्रपटाचा दमदार टिझर हा २४ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला होता. अभिनेत्री ‘आलिया भट्ट’ ही या चित्रपटात माफिया क्वीन ‘गंगूबाई काठियावाड़ी’ ची मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. टिझर मधील आलियाच्या जबरदस्त भूमिकेने तिचे फार कौतुक झाले होते. हा चित्रपट ३० जुलै २०२१ ला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरही प्रदर्शित करण्यात येणार आहे. आलिया सोबतच या चित्रपटात ‘अजय देवगन’ ही गंगूबाई काठीयावाड़ी या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. अजय देवगणच्या भूमिकेशिवाय ‘गंगूबाईं काठीयावाड़ी’चा प्रवास पूर्ण होऊ शकत नाही. अजय देवगन आणि आलिया भट्ट यांची यामध्ये जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळेल. ‘गंगूबाई काठीयावाड़ी’ हा चित्रपट हुसेन जैदी यांच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारित आहे.

अजयच्या भूमिकेबद्दल सांगायचे झाले तर, अजय हा यात एक महत्तवपूर्ण भूमिका साकारत आहे. चित्रपटातील ही भूमिका खूपच शक्तीशाली आणि अॅट्रॅक्टीव किंवा प्रभावशील अशी असणार आहे. अजय देवगनच्या सीनसाठी एक मोठा सेट तयार केला गेला होता. यापूर्वी १९९९ मध्ये संजय लिला भंसाली यांच्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटात काम केले होते. आता २१ वर्षानंतर दोघे पुन्हा एकत्र काम करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt ☀️ (@aliaabhatt)

- Advertisement -

 अजय आता अमिताभ बच्चन आगामी ‘मेडे’ या चित्रपटात दिसणार आहे. याव्यतीरिक्त मैदान या चित्रपटासाठी ही अजय चर्चेत दिसत आहे.


हे वाचा- कहो ना प्यार है चित्रपटातील अभिनेत्रीने केली कोट्यावधींची फसवणूक!

- Advertisement -