घरमनोरंजनअजय देवगणच्या 'भोला'ची प्रेक्षकांना भुरळ; 50 कोटींचा टप्पा पार

अजय देवगणच्या ‘भोला’ची प्रेक्षकांना भुरळ; 50 कोटींचा टप्पा पार

Subscribe

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा ‘भोला’ चित्रपट 30 एप्रिल रोजी रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटात अजयसोबत तब्बूही मुख्य भूमिकेत आहे. अजय आणि तब्बूच्या जोडीने पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली आहेत. ‘भोला’ हा चित्रपट प्रदर्शित होताच हा चित्रपट सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला. ‘दृश्यम 2’ नंतर अजय देवगणचा हा चित्रपट देखील उत्तम कमाई करताना दिसत आहे.

 

प्रदर्शित झाल्याच्या पहिल्याच आठवड्यातील वीकेंडला या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी या चित्रपटाने 11.20 कोटी कमावले. तर दुसऱ्या दिवशी 7.40 कोटी कमावले. तसेच शनिवारी या चित्रपटाने 12.10 कोटी कमावले आहेत. तर रविवारी चित्रपटाने 14 कोटी कमावले आहेत. या चित्रपटाने आत्तापर्यंत एकूण 44 कोटी कमावले असून लवकरच हा आकडा 50 कोटींचा टप्पा पार करेल.

- Advertisement -

काय आहे ‘भोला’ चित्रपटाची कथा?

‘भोला’ चित्रपटात तब्बू आणि अजय देवगण व्यतिरिक्त अमला पॉल, दीपक डोबरियाल, संजय मिश्रा आणि गजराज राव हे कलाकार देखील आहेत.‘भोला’ हा तमिळ चित्रपट ‘कैथी’चा रिमेक आहे. ‘दृश्यम 2’ नंतर या चित्रपटाद्वारे आता अजय आणि तब्बूची जोडी 9व्यांदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे.

 


हेही वाचा :

‘आम्ही सारे सावरकर…’ शरद पोंक्षेंची आजी भाजपच्या गौरव यात्रेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -