घरमनोरंजनअजय देवगणच्या 'भोला' चित्रपटाने पहिल्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

अजय देवगणच्या ‘भोला’ चित्रपटाने पहिल्या दिवशी कमावले तब्बल ‘इतके’ कोटी

Subscribe

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा ‘भोला’ चित्रपट गुरुवारी रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटात अजयसोबत तब्बूही मुख्य भूमिकेत आहे. अजय आणि तब्बूच्या जोडीने पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली आहेत. ‘भोला’ हा चित्रपट प्रदर्शित होताच हा चित्रपट सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला. ‘दृश्यम 2’ नंतर अजय देवगणचा आणखी एक चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, भोलाच्या पहिल्या दिवसाच्या कमाई समोर येत आहे.

‘भोला’ने पहिल्या दिवशी कमावले इतके कोटी

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘भोला’ चित्रपटाला उत्तर भारतात चांगला प्रतिसाद मिळाला. मीडिया रिपोर्ट्नुसार, या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी जवळपास 10 कोटींचा टप्पा पार केला आहे. येत्या दिवसांत या कमाईत सतत्याने वाढ होईल. अजयचा हा चित्रपट देखील ‘दृश्यम 2’ नंतर अजय देवगणचा आणखी एक चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करणार असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

‘दृश्यम 2’ ने पहिल्याच दिवशी केलेली कमाई

अजय देवगण याआधी ‘दृश्यम 2’ मध्ये दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत तब्बूही होती. चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर, ‘दृश्यम 2’ ने पहिल्या दिवशी जवळपास 15.38 कोटींची कमाई केली होती. या चित्रपटाच्या तुलनेत ‘भोला’ फारशी कमाई करु शकणार नसल्याचा अंदाज देखील वर्तवला जात आहे.

काय आहे ‘भोला’ चित्रपटाची कथा?

‘भोला’ चित्रपटात तब्बू आणि अजय देवगण व्यतिरिक्त अमला पॉल, दीपक डोबरियाल, संजय मिश्रा आणि गजराज राव हे कलाकार देखील आहेत.‘भोला’ हा तमिळ चित्रपट ‘कैथी’चा रिमेक आहे. ‘दृश्यम 2’ नंतर या चित्रपटाद्वारे आता अजय आणि तब्बूची जोडी 9व्यांदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा :

थिएटरमध्ये झळकताच पहिल्या दिवशी अजय देवणचा ‘भोला’ झाला ऑनलाइन लीक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -