घरमनोरंजनसाऊथ चित्रपट 'दसरा' पुढे अजय देवगणचा 'भोला' पडला फिका; कमावले इतके कोटी

साऊथ चित्रपट ‘दसरा’ पुढे अजय देवगणचा ‘भोला’ पडला फिका; कमावले इतके कोटी

Subscribe

सध्या बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. यात अजय देवगणचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘भोला’ आहे. तर साऊथ सुपरस्टार नानीचा तेलुगू चित्रपट ‘दसरा’ देखील आहे. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देताना दिसत आहेत. त्यामुळे आता बॉक्स ऑफिसवर नक्की कुठला चित्रपट वरचढ ठरेल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

‘भोला’ आणि ‘दसरा’मध्ये चढाओढ

Dasara Box Office Collection Day 2: After blockbuster opening Nani-Keerthy  Suresh's film sees a DROP | Regional-cinema News – India TV

- Advertisement -

रामनवमीच्या शुभमुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या भोला आणि दसरा चित्रपटाने अवघ्या चार दिवसात बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई केली आहे. आत्तापर्यंत अजय देवगणच्या भारतीय बॉक्स ऑफिसवर भोलाने 49.28 कोटी कमावले आहेत. तर जगभरातून एकूण 60.1 कोटी कमावले आहेत.

साउथ सुपरस्टार नानीच्या दसराने चार दिवसात 58.05 तर जगभरातून या चित्रपटाने 84.5 कोटी कमावले आहेत. त्यामुळे सध्या भोलापेक्षा दसरा चित्रपट बॉक्स ऑफिसवर वरचढ ठरत असल्याचं दिसत आहे.

- Advertisement -

काय आहे ‘भोला’ची कथा?

Bholaa Box Office Collection Day 3: 'भोला' के तीसरे दिन का कलेक्शन क्या है? यहां जानें

भोलाची कथा एक वडील (अजय देवगण) आणि त्याची 10 वर्षांची मुलगी यांच्याभोवती फिरते. भोला तुरुंगात आहे आणि आपल्या मुलीला भेटण्यासाठी आसुसलेला आहे. 10 वर्षांनंतर त्याची सुटका झाली आणि तो आपल्या मुलीला पहिल्यांदा भेटण्यासाठी उत्सुक आहे, परंतु भोला अचानक अशा काही परिस्थितीत अडकतो की त्याच्या जीवाला धोका असतो. आता तो आपल्या मुलीला कधी भेटू शकेल की नाही आणि तो स्वतःला संकटातून कसे बाहेर काढेल, या विषयावर आधारित ‘भोला’ चित्रपट आहे.

‘भोला’ चित्रपटात तब्बू आणि अजय देवगण व्यतिरिक्त अमला पॉल, दीपक डोबरियाल, संजय मिश्रा आणि गजराज राव हे कलाकार देखील आहेत.‘भोला’ हा तमिळ चित्रपट ‘कैथी’चा रिमेक आहे. ‘दृश्यम 2’ नंतर या चित्रपटाद्वारे आता अजय आणि तब्बूची जोडी 9व्यांदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे.

 


हेही वाचा :

अजय देवगणच्या ‘भोला’ची प्रेक्षकांना भुरळ; 50 कोटींचा टप्पा पार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -