Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन अजय देवगणच्या ‘दृश्यम 2’ने वरुण धवनच्या ‘भेडिया’ चित्रपटाला टाकलं मागे

अजय देवगणच्या ‘दृश्यम 2’ने वरुण धवनच्या ‘भेडिया’ चित्रपटाला टाकलं मागे

Subscribe

सध्या बॉलिवूडमध्ये अभिनेता अजय देवगणचा ‘दृश्यम 2’ आणि अभिनेता वरुण धवनचा ‘भेडिया’ चांगलाच चर्चेत आहे. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कोट्यावधींची कमाई करण्यास सुरुवात केली आहे. हे दोन्ही चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत.

अजय देवगणच्या ‘दृश्यम 2’ने कमावला करोडोंचा गल्ला
श्रिया सरन, अक्षय खन्ना आणि अजय देवगण यांचा ‘दृश्यम 2’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई केली आहे. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 103.50 कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या शुक्रवारी 7.75 कोटींची कमाई केली. तर शनिवारी 14 आणि रविवारी 17.50 कोटींची कमाई केली तर दुसऱ्या सोमवारी 5.50 कोटींची कमाई केली. दरम्यान, आत्तापर्यंत या चित्रपटाने एकूण 148.25 कोटींचा टप्पा पार केला आहे. चित्रपटाची वाढती कमाई पाहून निर्माते देखील खूप खूश आहेत.

- Advertisement -

‘भेडिया’ने कमावले इतके कोटी
वरुण धवनचा ‘भेडिया’ सध्या बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 7.25 कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी 9.25 कोटींचा टप्पा पार केली. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 11 कोटी तर चौथ्या दिवशी 3.50 कोटींची कमाई होती. आत्तापर्यंत या चित्रपटाने एकूण 31 कोटींची कमाई केली.

 

- Advertisement -

 


हेही वाचा :

विक्रम गोखले यांच्या ‘सूर लागू दे’ चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -