अजय देवगणच्या ‘दृश्यम 2’ने केला 100 कोटींचा टप्पा पार

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री तब्बू यांची मुख्य भूमिका असणारा ‘दृश्यम 2’ मागील अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. अवघ्या आठ दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कल्ला करायला सुरुवात केली आहे.

अजय देवगणच्या ‘दृश्यम 2’ने कमावला करोडोंचा गल्ला

 

View this post on Instagram

 

A post shared by Shriya Saran (@shriya_saran1109)

श्रिया सरन, अक्षय खन्ना आणि अजय देवगण यांचा ‘दृश्यम 2’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई केली आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 15.38 कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी 21.59 कोटींची कमाई केली. तर तिसऱ्या दिवशी 27.17 आणि चौथ्या दिवशी 11.75 कोटींची कमाई केली तर आठव्या दिवशी 7.50 कोटींची कमाई केली. दरम्यान, आत्तापर्यंत या चित्रपटाने एकूण 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. चित्रपटाची वाढती कमाई पाहून निर्माते देखील खूप खूश आहेत.

‘दृश्यम’ ने देखील जिंकलं होतं प्रेक्षकांचं मन
बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा ‘दृश्यम’ 2015 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी केले होते. या चित्रपटात श्रिया सरन, इशिता दत्ता, तब्बू दिसून आल्या होत्या. त्यावेळी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई केली होती.

‘दृश्यम 2’ आणि ‘भेडिया’मध्ये काटे की टक्कर
तब्बू आणि अजय देवगणच्या ‘दृश्यम 2’ चित्रपटासोबतच कृति सेनन आणि वरुण धवनचा भेडिया देखील नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘भेडिया’मुळे ‘दृश्यम 2’च्या कमाईत वाढ चढउतार होताना दिसत आहे.

 


हेही वाचा :

रणवीर-दीपिकाने मुंबईत खरेदी केले आलिशान घर; व्हिडीओ व्हायरल