अजय देवगणचा ‘दृश्यम २’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार रिलीज

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आपल्या आगामी ‘दृश्यम २’ चित्रपटामुळे सध्या सर्वत्र चर्चेत आहे. येत्या वर्षी दृश्यम २ चित्रपटगृहात रिलीज होईल. अभिनेत्री तब्बूने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर या चित्रपटाबाबत एक पोस्ट शेअर करून चित्रपटाची तारीख सुद्धा सांगितली आहे. गेल्या अनेक महिन्यांनपासून अजय देवगणचे चाहते ‘दृश्यम २’ चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

नुकत्याच अजय देवगणच्या रिलीज झालेल्या रनवे चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान अजय देवगणने चाहत्यांना ‘दृश्यम २’ चित्रपटाबाबत चाहत्यांना हिंट दिली होती. तब्बूने शेअर केलेल्या पोस्टमुळे ‘दृश्यम २’ चित्रपट लवकरच रिलीज होणार हे स्पष्ट झाले आहे.

या दिवशी रिलीज होणार ‘दृश्यम २’

 

View this post on Instagram

 

A post shared by Tabu (@tabutiful)

अजय देवगणचा ‘दृश्यम २’ येत्या वर्षात १८ नोव्हेंबर रोजी चित्रपगृहात रिलीज होणार आहे. दृश्यम चित्रपट साउथ चित्रपटाचा हिंदी रिमेक असून दृश्यमच्या हिंदी चित्रपटात अजय देवगण दिसून आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० करोडची कमाई केली होती.

काय असेल ‘दृश्यम २’ चित्रपटाची गोष्ट?

‘दृश्यम २’ चित्रपटामध्ये अजय देवगण सोबत अभिनेत्री तब्बू सुद्धा मुख्य भूमिकेत दिसून येईल. जवळपास ७ वर्षानंतर अजय देवगणने दृश्यम चित्रपटाचा सिक्वेलवर काम करायवला सुरूवात केली आहे. मागच्या वेळी त्याने विजय ही भूमिका साकारली होती. ‘दृश्यम’ चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे या ‘दृश्यम २’ मध्ये नक्की काय पाहायला मिळणार याबाबत प्रेक्षक उत्सुक आहेत.