घरमनोरंजनजिंकणे किंवा हरणे हा प्रत्येक खेळाचा भाग… टीम इंडियाच्या पराभवानंतर अजय देवगणची पोस्ट चर्चेत

जिंकणे किंवा हरणे हा प्रत्येक खेळाचा भाग… टीम इंडियाच्या पराभवानंतर अजय देवगणची पोस्ट चर्चेत

Subscribe

भारतीय नागरिकांबरोबरच मनोरंजनसृष्टीतील कलाकारांनी देखील टीम इंडियाला पाठिंबा दिला आहे. अभिनेता अजय देवगणने एक इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत टीम इंडियाचं कौतुक केलं आहे.

टी20 विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडने भारताचा 10 गडी राखून पराभव केला आहे. त्यामुळे उपांत्य फेरीत भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. परंतु या पराभवानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांनी टीम इंडियाला पाठिंबा दिला आहे. भारतीय नागरिकांबरोबरच मनोरंजनसृष्टीतील कलाकारांनी देखील टीम इंडियाला पाठिंबा दिला आहे. अभिनेता अजय देवगणने एक इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत टीम इंडियाचं कौतुक केलं आहे.

अजय देवगणने शेअर केली पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने टीम इंडियाचा एक फोटो शेअर करत त्यावर लिहिलंय की, तुम्हाला नेहमी पूर्ण देशाच्या जिंकण्याच्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी जीव तोडून मेहनत करताना पाहिलंय, त्यावेळी तुम्हाला चियर करण्याचा अनुभव खूप छान असतो. मात्र, तुमचा अंतिम सफर थोडा लहान राहिला. परंतु आम्ही यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला. संपूर्ण देश तुमच्याकडे टक लावून पाहत असतो. त्यावेळी तुमच्यावर किती दबाव येत असेल याची मी कल्पना देखील करु शकत नाही. जिंकणे किंवा हरणे हा प्रत्येक खेळाचा भाग आहे. पण आम्ही तुमच्या सोबत आहोत. प्रत्येक चढ-उतारात, प्रत्येक अडचणीत आणि प्रत्येक क्षणी, आम्ही जगातील सर्वोत्तम संघासोबत उभे आहोत. वर पहा मित्रांनो, आम्ही जोरदार पुनरागमन करू. तुझा चाहता अजय देवगण.’ अजय देवगणच्या ही पोस्ट सध्या चर्चेत असून सोशल मीडियावर व्हायरल देखील होत आहे.

भारतीय क्रिकेट चाहते नाराज
टी20 विश्वचषकात झालेल्या पराभवामुळे भारतीय क्रिकेट प्रेमी नाराज झाले आहेत. तर पाकिस्तानमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे. आता इंग्लंड आणि पाकिस्तानमध्ये टी20 विश्वचषकात काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा :

सोशल मीडियावर सुरू असलेल्या अफवांमुळे रश्मिका नेटकऱ्यांवर संतापली

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -