अजय-काजोलची लेक न्यासा पुन्हा झाली ट्रोल; व्हिडीओ होतोय व्हायरल

स्टार कीड म्हंटले की सगळ्यांच्याच नजरा त्यांच्यावर असतात. खूप कमी स्टार कीड असे ज्यांचे कौतुक करण्यात येते. पण गेल्या काही दिवसांपासून अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोल यांची मुलगी न्यासा हिला ट्रोल करण्यात येत आहे.

Ajay-Kajol's Daughter Nysa Devgan gets trolled again

सध्या इतर कोणत्याही स्टार कीडची फारशी चर्चा होताना दिसून येत नाहीये. पण अभिनेता अजय-काजोलची लेक न्यासा देवगण ही हल्ली जास्तच चर्चेत आहे. याआधी सुद्धा न्यासा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिली आहे. कधी ती तिच्या बोल्ड लूकमुळे, कधी तिच्या रंगामुळे तर कधी तिच्या कपड्यांमुळे ट्रोल झालेली आहे. पण आता न्यासा एका नवीन कारणामुळे ट्रोल होत आहे. न्यासावर तिच्या हिंदीमुळे लोकांकडून टीका करण्यात येत आहे.

अहमदनगर येथे एका ग्रामीण भागात एनवाय फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला न्यासा देवगण ही स्वतः उपस्थित होती. यावेळी तिच्या हस्ते एका गावातील डिजिटल लायब्ररीचे उद्घाटन देखील करण्यात आले. न्यासा या कार्यक्रमात पिवळा ड्रेस घालून आली होती. या कार्यक्रमात तिने पहिल्यांदाच शाळेतील मुला-मुलींसोबत संवाद साधला. त्यांच्यासोबत अनेक फोटो काढले. तर तिने विद्यार्थ्यांना पुस्तके, स्पोर्ट किट्स आणि इतर शालेय वस्तूंचे सुद्धा वाटप केले.

दरम्यान, या कार्यक्रमात न्यासाने विद्यार्थ्यांशी संवाद साधत असतानाच छोटे भाषण सुद्धा केले. या भाषणात तिने शिक्षण किती महत्वाचे आहे. वाचन किती महत्वाचे आहे, याबाबत न्यासाकडून यावेळी सांगण्यात आले. पण न्यासाने यावेळी हिंदीतून भाषण करून सुद्धा तिला हिंदी नीट न बोलता आल्याने तिला ट्रोल करण्यात येत आहे. अनेकांनी तिच्या भाषणाचा व्हिडीओ शेअर झाल्यानंतर या व्हिडिओवर कमेंट करत तिच्यावर टीका केली आहे.

न्यासाच्या या व्हिडीओवर अनेकांकडून प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. ‘जेव्हा तुम्हाला अशा कार्यक्रमात बोलायला दिलं जातं, ज्याच्याबद्दल तुम्हाला काहीच माहीत नसतं’, असं एकाने लिहिलं. तर ‘लाजेखातर मला हसू अनावर होतंय’, असंही दुसऱ्या युजरने लिहिले आहे. तर एकाने “अरे हिचं हिंदी ऐकून हिंदी भाषाही रडत असेल,” म्हंटले आहे. अरे देवा, हिला फक्त पार्ट्या करायला सांगा, अशी कमेंट सुद्धा एका युजरकडून करण्यात आली आहे.

हेही वाचा – सोनू निगमवरील हल्ल्यानंतर गायक शानने ISRAला लिहिले पत्र

अनेक स्टार कीड असे आहेत ज्यांच्यावर कायमच कॅमेरांची नजर असते. पण न्यासला जेव्हा कधी कॅमेरामध्ये टिपले जाते, तेव्हा ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ट्रोल होते. हल्लीच ती एका पार्टीमध्ये दिसली होती. पण यावेळी ती दारूच्या नशेत असल्याचे बोलले गेले होते. ज्यामुळे सुद्धा तिला ट्रोल करण्यात आले होते. तर अजय-काजोलचा मुलगा युग देवगण याच्यावर सुद्धा नेटकऱ्यांनी त्याच्या स्वभावामुळे टीका केली होती.