Saturday, April 10, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन वाढदिवसादिवशी अजयचा 'आरआरआर'मधील फर्स्ट लूक

वाढदिवसादिवशी अजयचा ‘आरआरआर’मधील फर्स्ट लूक

'आरआरआर' चित्रपटातील अजयची ही झलक पाहिल्यानंतर प्रेक्षकांची चित्रपटाबाबत आणखी उत्सुकता वाढली आहे.

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण सध्या त्याच्या कामात खूप व्यग्र आहे. आगामी दिवसांत तो त्याच्या बऱ्याच मोठ्या प्रोजेक्टवर काम करताना दिसत आहे. अजयने नुकताच त्याचा ५२ वा वाढदिवस साजरा केला आहे. वाढदिवसानिमित्त एक खास सरप्राइज त्याने त्याच्या चाहत्यांना दिले आहे. काही दिवसांपासून एस. एस. राजमौली दिग्दर्शित ‘आरआरआर’ या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगल्या होत्या. या चित्रपटात अजय देवगण खलनायकाची मुख्य भूमिका साकारणार अशी माहिती समोर आली होती. या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरपासून या चित्रपटात अजून कोण-कोणते कलाकार झळकणार याची प्रेक्षकांना उत्सुकता होती. आता या चित्रपटातील अजय देवगणचा धमाकेदार लूक प्रेक्षकांच्या समोर आला आहे. अजयचा ‘आरआरआर’ मधील फर्स्ट लूक मोशन पोस्टरसह प्रदर्शित करण्यात आला आहे. स्वत: अजयने त्याच्या वाढदिवसादिवशी चित्रपटातील हा फर्स्ट लूक त्याच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. यामध्ये त्याने एक शॉल परिधान केलेला आहे आणि त्याला काढताना त्याचे प्रभावशाली भूमिकेत दिसतो आहे. अजय देवगणला सैनिकांनी घेरलेले दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

 ही पोस्ट शेअर करताना, एस.एस. राजामौली इतके एक्साइटिंग आणि पावरफुल भूमिका दिल्याबद्दल अजयने त्यांचे आभार मानले आहे. या चित्रपटातील अजयची ही झलक पाहिल्यानंतर प्रेक्षकांची चित्रपटाबाबत आणखी उत्सुकता वाढली आहे. अजय त्याच्या प्रत्येक चित्रपटातील एंट्रीसीनमध्ये भरपूर अॅक्शन आणि इन्टेन्स ठेवतो. अजयचा असाच दमदार लूक ‘आरआरआर’ मध्ये ही दिसत आहे. अजयच्या आधी आरआरआर मध्ये ‘अल्लूरी सीता रामाराजू’च्या भूमिकेतील राम चरणचा लूक समोर आला होता. सोबतच आलिया भट्टनेही तिच्या वाढदिवसादिवशी चित्रपटातील तिचा ‘सीते’चा लूक प्रदर्शित केला होता.


- Advertisement -

हे वाचा- श्वेता तिवारीच्या लेकीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण!

- Advertisement -