Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन त्याने मला दया दाखवली नाही... तुरुंगातून सुटल्यानंतर एजाज खानचा समीर वानखेडेंवर हल्लाबोल

त्याने मला दया दाखवली नाही… तुरुंगातून सुटल्यानंतर एजाज खानचा समीर वानखेडेंवर हल्लाबोल

Subscribe

2021 मध्ये ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आलेल्या अभिनेता एजाज खानची दोन वर्षानंतर मुंबई आर्थर रोड तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर एजाज खानने आपल्यावर लागलेले सर्व आरोपांबाबत स्पष्टीकरण दिले आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत एजाज खानने समीर वानखेडे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

खरंतर, समीर वानखेडे यांच्या पथकाने एजाजला 2021 मध्ये अटक केली होती. 2021 मध्ये समीर वानखेडे यांनी ड्रग्ज घेणाऱ्या आणि त्याची विक्री करणाऱ्यांविरोधात शोध मोहीम सुरू केली. त्यावेळी एनसीबीच्या रडारवर अनेक सेलिब्रिटी आले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajaz Khan (@imajazkhan)

- Advertisement -

एजाज खान 19 मे रोजी तुरुंगातून बाहेर आला. जवळपास 2 वर्ष तुरुंगात राहिल्यानंतर बाहेर येताच त्याने समीर वानखेडेवर टिका करायला सुरुवात केली आहे. एका वृत्तपत्रासोबत बोलताना तो म्हणाला की, “समीर वानखेडेला आज त्याच्या कृत्याची शिक्षा भोगावी लागत आहे. त्याने जे दु:ख इतरांना दिले, तेच आज त्याला परत मिळत आहे.”

समीरने मला दया दाखवली नाही

एजाज म्हणाला की, “मी समीरला दयेची याचना केली होती, पण त्याने माझ्यावर अजिबात दया दाखवली नाही”. त्यानंतर
एजाजला तुरुंगात राहिल्यानंतर त्याच्या आयुष्यात काय बदल झाला असे विचारण्यात आले. तो म्हणाला की, “तुरुंगात गेल्यानंतर व्यावसायिकदृष्ट्या मला या वर्षांत खूप त्रास सहन करावा लागला. वेब सिरीज माझ्या हातातून गेली. मी तुरुंगातून होतो आणि माझा लहान मुलगा मनोचिकित्सकाकडे उपचार घेत होता. तुरुंगात गेल्यावर आम्ही भेटू शकलो नाही. तुरुंगात गेल्यानंतर मी भावनिक, मानसिक पूर्णपणे कोलमडलो होतो.”

- Advertisement -

 


हेही वाचा :

‘गदर’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; नेटकऱ्यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

- Advertisment -