घरमनोरंजन'मन उडू उडू झालं' फेम इंद्राचं 'नाते नव्याने' हे नवं गाणं प्रेक्षकांच्या...

‘मन उडू उडू झालं’ फेम इंद्राचं ‘नाते नव्याने’ हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Subscribe

एव्हरेस्ट एन्टरटेनमेन्टचं 'नाते नव्याने' हे गाणं प्रदर्शित झालं असून अजिंक्य आणि शिवानी हि जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. शुक्रवारी १७ जून रोजी या नव्या गाण्याचा शुभारंभ करण्यात आला. त्याचबरोबर बुधवारी या गाण्याचा ट्रेलर आणि टिझर सुद्धा प्रदर्शित करण्यात आला होता. संगीत प्रेमींकडून त्यालाही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

मन उडू उडू झालं या मालिकेतून घराघरात पोहोचलेला डॅशिंग इंद्रा म्हणजेच अभिनेता अजिंक्य राऊत(ajinkya raut) आणि अभिनेत्री शिवानी बावकर (shivani baokar) हे दोघंही एका नवीन मराठी गाण्यामधून प्रेक्षकांना भेटीला आले आहेत. एव्हरेस्ट एन्टरटेनमेन्टचं ‘नाते नव्याने’ (nate navyane) हे गाणं प्रदर्शित झालं असून अजिंक्य आणि शिवानी ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सोशल मीडियावर या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवारी १७ जून रोजी या नव्या गाण्याचा शुभारंभ करण्यात आला. त्याचबरोबर बुधवारी या गाण्याचा ट्रेलर आणि टिझरसुद्धा प्रदर्शित करण्यात आला होता. संगीत प्रेमींकडून त्यालाही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

हेही वाचा – समाजातल्या विकृतीवर भाष्य करणारा ‘युथट्यूब’

- Advertisement -

शुक्रवारी प्लाझा सिनेमा येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ‘नाते नव्याने’ हे गाणे प्रदर्शित करण्यात आले. या गाण्याचा व्हिडीओ चित्रपट चित्रात करावा अश्या पद्धतीने करण्यात आला आहे. आणि हा गाण्याचा व्हिडिओ मोठ्या पडद्यावर अगदी उत्तम दिसतो आहे. यावेळी अभिनेता अजिंक्य राऊत आणि अभिनेत्री शिवानी बावकर आणि इतर कलाकार मंडळी आणि त्यांच्या यासोबतच दिगदर्शक ओमकार एच माने, गायक हृषीकेश रानडे (hrishikesh rande), गायिका आनंदी जोशी (anandi joshi), संगीत दिग्दर्शक श्रवण दंडवते तसेच गीतकार मुरलीधर राणे इत्यादी मंडळी उपस्थित होती.

हेही वाचा – नेहा कामतचा मालिकेत नवा लुक, व्हिडिओ पोस्ट करताच सोशल मीडियावर चर्चा

- Advertisement -

या गाण्याचा टिझर आणि ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच त्याला संगीत प्रेमींकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या टिझर आणि ट्रेलर मधून या गाण्याची पार्श्वभूमी समोर येते. प्रेमकथेचा पार्श्वभूमीवर हे गाणं आहे. मायरा आणि जय यांच्या मधली ही प्रेम कहाणी या गाण्यात चित्रित करण्यात आली आहे. काहीश्या गोंधळाच्या आणि गुंतागुंतीच्या परिस्थितीमध्ये ही प्रेमककथा आकार घेते. या गाण्यामधील प्रेमभावना अगदी नितळ आहेत. पण गाण्याचा नायक मात्र तो त्या भावना नायिकेसमोर मोकळेपणाने मांडू शकत नाही. त्यामुळे या गाण्याच्या व्हिडीओ बद्दलची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये अधिक ताणली आहे.

एव्हरेस्ट एन्टरटेनमेन्टचे संजय छाब्रिया या गाण्यासंदर्भात बोलताना म्हणले, की आम्ही या गाण्याच्या माध्यमातून एक नवा आणि वेगळा प्रयोग मराठी मध्ये केला आहे. ह्या गाण्याचा व्हिडिओ युट्युबच्या माध्यमातून प्रेक्षक पाहू शकणार आहेत. आमचा हा नवीन प्रयोग आमच्या आधीच्या प्रयोगांप्रमाणेच मराठी प्रेक्षकांना भावेल, आवडेल. या आधीच्या आमच्या प्रयोगांना रसिकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. एव्हरेस्ट म्युझिकने आजतागायत अनेक आघाडीच्या गायकांची अनेक लोकप्रिय गाणी प्रेक्षकांसाठी उपलब्ध करून दिली आहेत. त्यात सुरेश वाडकर, सुदेश भोसले, श्रेया घोषाल (shreya ghoshal), सुनिधी चौहान, अवधूत गुप्ते, अजय – अतुल (ajay – atul) यांच्या गाण्यांचा समावेश आहे. त्यातील काही गाण्यांना ६० दशलक्षच्या घरात प्रेक्षकसंख्या मिळाली आहे. कोणत्याही मराठी युट्युब चॅनलसाठी एवढी प्रेक्षकसंध्या मिळणं म्हणजे एक विक्रमच आहे.

त्याचबरोबर अजिक्य राऊत आणि शिवानी बावकर हे दोन्ही कलाकार प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणावफर प्रसिद्ध आहेत. त्यामुळे त्यांचे हे नवीन गाणे कोणता नवा विक्रम करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -