घरमनोरंजन'वलीमाई' आणि 'भीमला नायक'ने बॉक्स ऑफिसवर आलियाच्या 'गंगूबाई'ला टाकले मागे

‘वलीमाई’ आणि ‘भीमला नायक’ने बॉक्स ऑफिसवर आलियाच्या ‘गंगूबाई’ला टाकले मागे

Subscribe

कॉलिवूड सुपरस्टार अजित कुमारचा बहुप्रतिक्षित तमिळ चित्रपट वलीमाई सिनेमागृहात पोहोचला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे चित्रपटाच्या आगाऊ बुकिंगचे आकडेही मोठे आहेत. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने एकट्या तामिळनाडू बॉक्स ऑफिसवर सुमारे 36.17 कोटींची कमाई केली. तर दुस-या दिवशी 24.62 कोटींचा बिझनेस झाला तर तिसर्‍या दिवसाच्या बिझनेसबद्दल बोलायचे झाले तर वलीमाईने जवळपास 16 कोटींचा गल्ला जमवला आहे. यामुळे या आठवड्यात वलीमाई हा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, आलिया भट्टच्या गंगूबाई काठियावाडीने पहिल्या दोन दिवसांत केवळ 23 कोटींची कमाई केली आहे. तर भीमला नायकनेही बॉक्स ऑफिसवर 79 कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर ‘वलीमाई’ आणि ‘भीमला नायक’ या दोन्ही चित्रपटांनी आलियाच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटालाही मागे टाकले आहे.

साऊथचे सुपरस्टार अजित कुमार आणि हुमा कुरेशी यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘वलीमाई द पॉवर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. अजित कुमारच्या चाहत्यांना त्याचा चित्रपट खूप पसंतीस पडतोय. दिग्दर्शक एच विनोद आणि चित्रपट निर्माते बोनी कपूर यांचा अंदाजे 160 कोटी रुपयांचा हा चित्रपट आहे. त्यामुळे चित्रपटाच्या चांगल्या कामगिरीमुळे लवकरच हा चित्रपट आपली किंमत वसूल करेल असे बोलले जात आहे. तथापि, काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, निर्मात्यांनी तामिळनाडू थिएटर राइट्सद्वारे 62 कोटी रुपये कमावले होते. केरळ आणि कर्नाटकमध्येही या चित्रपटाने थिएटरचे हक्क विकून 3.5 आणि 5.5 कोटी रुपये कमावले.

- Advertisement -

अजित कुमारचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा चित्रपट मानला जातो. हा चित्रपट जगभरात 4500 स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. तामिळनाडूतील बहुतांश शहरांमध्ये त्याने कमाईचे जुने रेकॉर्ड मोडल्याचे म्हटले जात आहे. हे दोन्ही चित्रपट गेल्या वर्षी चित्रपटगृहात प्रदर्शित झाले होते आणि दोन्ही चित्रपट प्रचंड हिट ठरले होते.

वलीमाई हा एक फुल ऑन मसाला अॅक्शन चित्रपट आहे. ज्याचे दिग्दर्शन एच विनोद यांनी केले आहे. ही कथा आहे एका प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याची जो बाईक गँगशी लढतो. तमिळसोबतच हा चित्रपट हिंदी, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषेतही प्रदर्शित झाला आहे. समीक्षकांनी या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद दिला असला तरी त्याला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे.


तब्बूने ‘Bhool Bhulaiyaa 2’ सिनेमाचे शूटिंग केले पूर्ण


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -