Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन मृत्यूनंतर आकांक्षा दुबेचा नवा व्हिडिओ समोर, रडत म्हणाली...

मृत्यूनंतर आकांक्षा दुबेचा नवा व्हिडिओ समोर, रडत म्हणाली…

Subscribe

भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे हिच्या मृत्यूनंतर एक व्हिडिओ समोर आला आहे. तिचा हा व्हिडिओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. या व्हिडिओत आकांक्षा दुबे हिने समर सिंहवर काही आरोप लावले आहेत. आकांक्षा ही रडत रडत असे म्हणत आहे की, ‘मी काय चुक करतेय हे मला माहिती नाही, पण मला या जगात रहायचे नाहीयं’ जर मला काही झाले तर त्याला जबाबदार समर सिंहच आहे.

व्हिडिओ कधीचा आहे याची पुष्टी झालेली नाही. आकांक्षा दुबे हिने मृत्यूपूर्वी सोशल मीडियात काही स्टेटस शेअर केले होतो. व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलीस सुद्धा हैराण झाले आहेत. व्हिडिओचे वेरिफिकेशन वाराणसी पोलिसांकडून केले जात आहे.

- Advertisement -

आकांक्षा दुबे हिच्या केसमध्ये पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच अभिनेता आणि गायक समर सिंह यांना अटक केली आहे. तिच्या मृत्यूनंतर सातत्याने चौकशी केली जात आहे. खरंतर आकांक्षा दुबे हिच्या मृत्यूनंतर समर सिंह फरार झाला होता. दरम्यान, अवघ्या कमी कालावधीतच पोलिसांनी ताब्यात घेतले.

- Advertisement -

तर, भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे ही सिनेमाच्या शुटिंगसाठी वाराणसीला गेली होती. २६ मार्चला हॉटेलच्या एका खोलीत तिने गळफास लावून घेत आपले आयुष्य संपवले होते. त्यानंतर आकांक्षा हिच्या परिवाराने समर सिंह आणि त्याच्या भावावर गंभीर आरोप लावले होते.


हेही वाचा: Kpop Band स्टार मूनबिन याचा संशयास्पद मृत्यू; राहत्या घरात आढळला मृतदेह

- Advertisment -