एनबीकेंचा Akhanda OTT वर ठरला ब्लॉकबस्टर!

सध्या प्रेक्षकांवर पुष्पा या तमिळ सिनेमाची जादू आहे त्याचप्रमाणे सध्या अखंडा या सिनेमाने तेलुगु प्रेक्षकांवर भुरळ घातली आहे.

Akhand is first Telugu movie to get the highest viewership and watchtime on Disney Plus Hotstar
एनबीकेंचा Akhanda OTT वर ठरला ब्लॉकबस्टर!

डिज़्नी+ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सध्या अखंडा (Akhanda)  हा तेलुगु सिनेमा धुमाकूळ घालत असून हॉटस्टारवर आतापर्यंत सर्वाधिक व्यूअरशिप आणि वॉचटाइम मिळवणारा पहिला तेलुगु सिनेमा ठरला आहे.  डिज़्नी+ हॉटस्टारच्या प्रेक्षकांनी नंदामुरी बालकृष्णला अखंडमधील नव्या लूकसाठी प्रेमाचा आणि कौतुकाचा वर्षाव केला आहे. कोरोना काळात सिनेमागृहे कमी क्षमतेने सुरू असतानाही या सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिले आणि आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील सिनेमाची चलती पहायला मिळत आहे.

अखंडा हा 2021मध्ये आलेल्या एक तेलुगु ड्रामा असून नंदामुरी बालकृष्ण यांनी सिनेमाचे लिखाण केले असून दिग्दर्शन देखील त्यांचेच आहे. बॉक्स ऑफिसवर देखील सिनेमाने चांगली कमाई केली होती. बॉक्स ऑफिसवर सिनेमाने 130 कोटींहून अधिक गल्ला जमवला होता. 21 जानेवारी 2022 ला सिनेमा डिज़्नी+ प्लस हॉटस्टारवर रिलीज करण्यात आला. सिनेमा रिलीज होताच 4 दिवसातच सिनेमाने नवे रेकॉर्ड बनवले आहेत. सिनेमात नंदामुरी बालकृष्ण यांच्या या सिनेमात अभिनेत्री प्रज्ञा जेस्वाल देखील मुख्य भूमिकेत आहे. तर एस. थमन यांनी सिनेमाला संगीत दिले आहे. सिनेमाच्या संगीताने प्रेक्षकांचे सर्वाधिक लक्ष वेधून घेतले आहे.

अखंडा या सिनेमाच्या यशाविषयी बोलताना नंदामुरी बालकृष्ण म्हणाले, मी प्रेक्षकांच्या आभार मानतो. त्यांच्या साथीमुळेच मी आजपर्यंत अनेक वेगवेगळ्या गोष्टी करू शकलो. माझ्याकडे भगवान शंकराचे आशिर्वाद आहेत त्यामुळेच बॉक्स ऑफिसवर 50दिवसात भरगोस यश मिळवू शकलो. बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करून सिनेमा ओटीटीवर देखील रेकॉर्ड तोड कमाई करत आहे.

ज्या प्रकारे सध्या प्रेक्षकांवर पुष्पा या तमिळ सिनेमाची जादू आहे त्याचप्रमाणे सध्या अखंडा या सिनेमाने तेलुगु प्रेक्षकांवर भुरळ घातली आहे. पुष्पानंतर येत्या काळात सर्वाधिक हीट होणारा हा साउथ इंडियन सिनेमा असल्याचे म्हटले जात आहे.


हेही वाचा – पतीच्या मृत्यूनंतर आजही Amir Khanची वाट पाहतेय कमला बाई, काय आहे प्रकरण?