घरमनोरंजनमौनी आणि अक्षयकुमारचे 'गोल्ड' ठुमके

मौनी आणि अक्षयकुमारचे ‘गोल्ड’ ठुमके

Subscribe

'गोल्ड' हा चित्रपट भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्या ऑलिम्पिक गोल्डची कथा आहे. या चित्रपटात प्रथमच 'नागिन' मालिकेमुळे प्रसिद्ध झालेली मौनी रॉय मोठ्या पडद्यावर येत आहे.

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या आपल्या ‘गोल्ड’ चित्रपटासाठी खूपच उत्सुक आहे. अक्षय कुमार नेहमीच वेगळा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येतो. ‘गोल्ड’ हा चित्रपट भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्या ऑलिम्पिक गोल्डची कथा आहे. या चित्रपटात प्रथमच ‘नागिन’ मालिकेमुळे प्रसिद्ध झालेली मौनी रॉय मोठ्या पडद्यावर येत आहे. नुकतचं अक्षय आणि मौनीच्या ‘गोल्ड’ चित्रपटातील ‘नैनो से बांधी’ हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं. गाणं प्रदर्शित करण्यात आल्यानंतर अक्षय आणि मौनीनं बिनधास्तपणानं ठुमके लावले.

अक्षयनं आणि मौनीनं केलं ट्विट

अक्षयनं हे गाणं ट्विट करत आपलं आवडतं गाणं असल्याचं सांगितलं. तर मौनीनं आपल्या अकाऊंटवरून या वेळचे काही क्षण पोस्ट केले आहेत. अक्षय आणि मौनीची केमिस्ट्री या नाचातून दिसून येते आहे. मौनीनं ‘आनंदाचा दिवस’ असं कॅप्शन देत आपले फोटो पोस्ट केले असून नाचताना तिच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोंमध्ये ‘आम्ही सर्व डान्स फ्लोअरवर नाचलो’ असंही कॅप्शन मौनीनं दिलं आहे. मौनीचा हा बॉलीवूडमधील पहिलाच चित्रपट असून ती छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. त्यामुळं मोठ्या पडद्यावर ती काय कमाल दाखवणार याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना आहे.

- Advertisement -

अक्षयची वेगळी भूमिका

या चित्रपटात अक्षय कुमारनं असिस्टंट मॅनेजर ‘तपन दास’ ची भूमिका साकारली आहे. तर अक्षय आणि मौनीबरोबर या ‘गोल्ड’मध्ये कुणाल कपूर, अमित साध आणि विनीत कुमार यांच्यादेखील भूमिका आहेत. हा चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार असून सध्या त्याची गाणी प्रदर्शित होत आहेत. लवकरच याच्या प्रमोशनला सुरुवात होईल.

It was a happy happy day ❤

A post shared by mon (@imouniroy) on

Nàino né bäändhį kãīsi dōōr vę …. #soon

A post shared by mon (@imouniroy) on

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -