घर मनोरंजन अक्षय केळकर ठरला “बिग बॉस मराठी 4"चा महाविजेता!

अक्षय केळकर ठरला “बिग बॉस मराठी 4″चा महाविजेता!

Subscribe

मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय ‘बिग बॉस’शो मागील अनेक दिवसांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत होता. यंदाच्या या चौथ्या पर्वात नक्की कोण विजेता होईल? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते. रविवारी या शोचा महाअंतिम सोहळा पार पडला आणि ‘बिग बॉस मराठी 4’च्या विजेचत्याची घोषणा करण्यात आली. अक्षय केळकर या कार्यक्रमाचा विजेता ठरला.

काल (8 जानेवारी) संध्याकाळी 7 वाजल्यापासून बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्याला सुरुवात झाली होती. यावेळी बिग बॉसच्या चौथ्या पर्वात सहभागी झालेले सर्व स्पर्धक उपस्थित होते. तसेच यावेळी सर्व स्पर्धकांचा नृत्याविष्कार प्रेक्षकांना पाहायला मिळाला.

- Advertisement -

5 स्पर्धाकांमध्ये रंगली होती चुरस

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kelkar (@akshaykelkar)

यावेळी महाअंतिम फेरीत राखी सावंत, अमृता घोंगडे, अपूर्वा नेमळेकर, अक्षय केळकर आणि किरण माने हे पाच स्पर्धक होते. सुरुवातील राखी सावंत एक्झिट झाली, तिच्यानंतर अमृता धोंगडे देखील एक्झिट झाली. त्यानंतर किरण माने एक्झिट झाले. शेवटी अपूर्वा नेमळेकर आणि अक्षय केळकर हे टॉप 2 स्पर्धक होते. अखेर महेश मांजरेकरांनी अक्षय केळकरच्या नावाची विजेता म्हणून घोषणा केली. यावेळी अक्षयला बिग बॉसची दिमाखदार ट्रॉफी आणि 15 लाख 55 हजार रुपये रक्कम देण्यात आली. त्याबरोबर त्याला पु.ना.गाडगीळ आणि सन्स तर्फे 10 लाख रुपयांचे गिफ्ट व्हाऊचरही देण्यात आले. शिवाय सीझनचा बेस्ट कॅप्टन म्हणून त्याला फिनोलेक्स पाइप कडून 5 लाख रुपये देखील देण्यात आले.


- Advertisement -

हेही वाचा :

डोंबिवलीत पुस्तक आदान प्रदान सोहळा

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -